महाराष्ट्र बंद मागे घ्यावा; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर Sharad Pawar यांचे मविआला आवाहन

258
महाराष्ट्र बंद मागे घ्यावा; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर Sharad Pawar यांचे मविआला आवाहन
महाराष्ट्र बंद मागे घ्यावा; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर Sharad Pawar यांचे मविआला आवाहन

महाविकास आघाडीने उद्या दिलेली महाराष्ट्र बंदची (Maharashtra Bandh) हाक बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी मविआला उद्याचा बंद मागे घ्यावा, असे आवाहन केले आहे.

(हेही वाचा – Jammu-Kashmir Assembly Elections : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार ‘इतक्या’ जागा)

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाने राजकीय पक्षांनी पुकारलेला बंद बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसून जे लोक बंद पुकारतील त्यांच्या विरोधात कारवाई करा, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी हे आवाहन केले आहे.

सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही

शरद पवार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरुद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. त्यामुळे भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद (Maharashtra Bandh) मागे घ्यावा, असे आवाहन करण्यात येते,” अशा शब्दांत पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.