FDC Drugs Bans : केंद्रीय आरोग्य विभागाची 156 एफडीसी औषधांवर बंदी

132
FDC Drugs Bans : केंद्रीय आरोग्य विभागाची 156 एफडीसी औषधांवर बंदी

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने 156 एफडीसी औषधांवर बंदी (FDC Drugs Bans) घातली आहे. याबाबत सरकार आणि आरोग्य विभागाकडून मागच्या बऱ्याच दिवसांपासून काम सुरू होते. दरम्यान, लोकांच्या आरोग्याचा विचार करून सरकारने काही निवडक औषधांवर बंदी घातली आहे. या औषधांच्या कॉम्बिनेशनचा शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी माहितीही समोर आली आहे.

(हेही वाचा – Crude Oil Import : भारताची रशियाकडून तेल आयात विक्रमी स्तरावर)

जी औषधे दोन किंवा अधिक औधषांचे रसायन एका विशिष्ट्य प्रमाणात वापरून तयार केली जातात, त्यांना एफडीसी म्हटले जाते. सध्या देशामध्ये अशा औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. दरम्यान, ताप, सर्दी, अॅलर्जी, अंगदुखी, डोकेदुखी यासारख्या किरकोळ आजारांवर उपचार ठरणारी 156 एफडीसी औषधांवर बंदी (FDC Drugs Bans) घातली आहे. आता मेडिकल स्टोअर्समधून ही औषधे विकता येणार नाहीत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही औषधे प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकतात.

(हेही वाचा – Maharashtra Bandh : चौथ्या शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’; सर्वसामान्यांमध्ये चर्चा)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 12 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार सरकारने फार्मा कंपन्यांकडून वेदनाक्षमक औषधांच्या रूपात वापरण्यात येणाऱ्या एसेक्लोफेनाक 50 एमजी+पॅरासिटामॉल 125 एमजी टॅबलेटवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सरकारने पॅरासिटामॉल, ट्रामाडोल, टारिन आणि कॅफिन यांच्या कॉम्बिनेशनवरही बंदी घातली आहे. मल्टीव्हिटॅमिनच्या काही औषधांनाही याच्या चौकटीत आणण्यात आले आहे. मोठ्या फार्मा कंपन्यांकडून बनवण्यात येणाऱ्या वेदनाक्षामक औषधांमधील हे प्रसिद्ध कॉम्बिनेशन आहे. (FDC Drugs Bans)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.