Maharashtra Bandh : महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीस

139
Maharashtra Bandh : महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीस

बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने शनिवारी (२४ ऑगस्ट) पुकारलेला महाराष्ट्र बंद हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना शुक्रवारी (२३ ऑगस्ट) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ नुसार कलम १६८ प्रमाणे नोटीस जारी करण्यात आलेल्या आहेत. नोटीसचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

बदलापूर येथे एका प्रतिष्ठित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने शनिवारी (२४ ऑगस्ट) ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली होती. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात (हायकोर्ट) महाराष्ट्र बंदच्या विरोधात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी या याचिकेवर हायकोर्टाने बंद हा बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा – Jammu-Kashmir Assembly Elections : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार ‘इतक्या’ जागा)

दरम्यान मुंबई पोलिसांकडून १८ ऑगस्ट २०२४ रोजी एक आदेश जारी करण्यात आला होता, या आदेशात १८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२४ दरम्यान मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नसल्याचे आदेशात म्हटले होते, या आदेशात विवाह समारंभ, अंत्यविधी यात्रा, चित्रपटगृहे, सरकारी कामकाज यांना वगळण्यात आलेले आहे. या आदेशाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा २०२३ कलम १६८ नुसार नोटीसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीचे बडे नेते तसेच स्थानिक नेत्यांना नोटीस बजावली आहे.

(हेही वाचा – Maharashtra Bandh : चौथ्या शनिवारी ‘महाराष्ट्र बंद’; सर्वसामान्यांमध्ये चर्चा)

काय म्हटले आहे नोटीसमध्ये? 

या नोटीसद्वारे आपणास निर्देश देतो की, आपणाकडून आपल्या सहकारी तथा कार्यकत्यांकडून सदर महाराष्ट्र बंद/भारत बंद मध्ये सहभागी होऊन प्रत्यक्षरित्या केलेल्या कृत्यामुळे अथवा अकृत्यामुळे कोणतीही सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग झाल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोणतीही जिवीत किंवा सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेचे नुकसान झाल्यास आपणास व संबंधितांना सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.