मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने Sunil Pawar यांचा ‘अमृतपर्व’ पुरस्काराने सन्मान

99
मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने Sunil Pawar यांचा 'अमृतपर्व' पुरस्काराने सन्मान
मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने Sunil Pawar यांचा 'अमृतपर्व' पुरस्काराने सन्मान

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई (Marathi Vrttapatra Lekhaka Sangha) यांच्या वतीने वृत्तपत्र लेखक दिनानिमित्त पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. याच निमित्ताने संघाच्या वतीने उद्योजक आणि श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार (Sunil Pawar) यांचा ‘अमृतपर्व’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सुनील पवार यांच्या निवासस्थानी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

(हेही वाचा – महाराष्ट्र बंद मागे घ्यावा; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर Sharad Pawar यांचे मविआला आवाहन)

२२ ऑगस्ट १९४९ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेला २२ ऑगस्ट २०२४ मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राच्या वेळी हा सन्मान करण्यात आला. संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा, तसेच त्यांच्या शिवकार्याची दखल घेवून संस्थेने त्यांचा सन्मान केला आहे.

या वेळी संस्थेचे माजी अध्यक्ष विजय कदम, माजी अध्यक्ष मनोहर साळवी, प्रकार्यवाह प्रशांत घाडीगावकर, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड नितीन कदम, प्रा. हेमंत सामंत, माजी नगरसेवक मनमोहन चोणकर, दिगंबर चव्हाण, दत्ताराम गवस, राजन देसाई, चंद्रकांत पाटणकर, श्रीनिवास डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते. (Sunil Pawar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.