शिवसेना म्हणजे देशात हिंदुत्व, राज्यात मराठी! 

आजही जेव्हा मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो, तेव्हा शिवसेना समोर दिसते, तसेच प्रखर, ज्वलंत हिंदुत्वाचा विचार हा केवळ शिवसेनाच मांडते, असे संजय राऊत म्हणाले.

210

शिवसेना आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार चालत आहे. देशात शिवसेना हिंदुत्व, राष्ट्रवादाचा विचार मांडते, मात्र राज्यात मराठी माणसाचे हित जपते, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेना ५५ वर्षे टिकून! 

शिवसेनेला ५५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा अनेकांना वाटले होते कि, शिवसेना ५-६ वर्षांत बंद पडेल, ती मुंबई, ठाण्याबाहेर जाणार नाही, पण शिवसेना महाराष्ट्रात सर्वदूर पोहचली, तसेच दिल्लीतही धडकली, स्वतःचा विचार मांडत राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण करत ५५ वर्षे टिकून आहे. शिवसेनेच्या आधी आणि नंतर आलेले पक्ष काळाच्या ओघात नष्ट झाले, असेही संजय राऊत म्हणाले.

(हेही वाचा : आजपासून लसीकरणासाठी ३० ते ४४ नवा वयोगट!)

राष्ट्रीय पातळीवर सेनेचा सूर्य तळपणार!

‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे शिवसेनेसाठीच लिहिले गेले असावे, कारण भविष्यात राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा सूर्य तळपत राहणार आहे, असेही राऊत म्हणाले. आज राज्यात शिवसेनेची सत्ता आहे, सेनेचा मुख्यमंत्री आहे. आजही जेव्हा मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो, तेव्हा शिवसेना समोर दिसते, तसेच प्रखर, ज्वलंत हिंदुत्वाचा विचार हा केवळ शिवसेनाच मांडते, असे संजय राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.