Sangli Congress Rebel : बंडखोर काँग्रेस नेत्याच्या मेळाव्याला ठाकरे सांगलीत

178
Sangli Congress Rebel : बंडखोर काँग्रेस नेत्याच्या मेळाव्याला ठाकरे सांगलीत

सांगली लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या शिवसेना (उबाठा) चे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव करणाऱ्या काँग्रेस बंडखोर अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्या मेळाव्याला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. (Sangli Congress Rebel)

महाविकास आघाडीत ठिणगी

सांगली लोकसभा मतदार संघातून विशाल पाटील काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्पर सांगलीत जाऊन डबल केसरी विजेते पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आणि महाविकास आघाडीत ठिणगी पडली.

(हेही वाचा – Water Cut : ‘या’ भागातील नागरिकांनी आतापासूनच पाणी वापरा जपून, कारण शुक्रवारसह शनिवारी राहणार पूर्ण कपात)

ठाकरे पुन्हा काँग्रेसच्या मेळाव्यात

विशाल पाटील समर्थक काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनीही पाटील यांच्या विजयासाठी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात काम केले. असे असताना ५ सप्टेंबर २०२४ ला विश्वजित कदम यांचे वडील आणि दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे, त्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शरद पवार त्याचबरोबर शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील कडेगाव या गावी उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. तर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. (Sangli Congress Rebel)

(हेही वाचा – काळे झेंडे – काळी पट्टी बांधून राज्यात होणार आंदोलन – Nana Patole)

निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग

या मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना विश्वजित कदम यांनी निमंत्रण दिले आहे. बहुतांशी नेत्यांनी येण्याची तयारी दर्शविली असल्याचे सांगण्यात येते. यावेळी कडेगावमध्ये ‘मविआ’ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढण्यात येणार असून रॅलीची सांगता मातोश्री बयाबाई कदम महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा मेळावा होणार आहे. (Sangli Congress Rebel)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.