Uddhav Thackeray यांच्याकडूनही Maharashtra Bandh मागे; तोंडाला काळे फडके बांधून करणार निदर्शने

195
Uddhav Thackeray यांच्याकडूनही Maharashtra Bandh मागे; तोंडाला काळे फडके बांधून करणार निदर्शने
Uddhav Thackeray यांच्याकडूनही Maharashtra Bandh मागे; तोंडाला काळे फडके बांधून करणार निदर्शने

मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीचा उद्याचा महाराष्ट्र बंद अवैध असल्याचे सांगितल्यानंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतर नाना पटोले यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणार असल्याचे विधान केले. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही बंद मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. बंद (Maharashtra Bandh) मागे घेतला असला, तरी सकाळी 11 ते 12 या वेळेत तोंडाला काळे फडके बांधून शांततेत निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा – शरद पवारसुद्धा Uddhav Thackeray ना कंटाळले आहेत; Chandrashekhar Bawankule यांचा हल्लाबोल)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या वेळी म्हणाले की, हे आंदोलन विकृतीच्या विरोधात आहे. या आंदोलनात प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हायला पाहिजे. तसेच मविआचे नेते उद्या 11 वाजता काळ्या फिती बांधून आणि हातात काळा झेंडा घेऊन शिवसेना भवनाच्या बाहेर बसणार आहेत. उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही, पण सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. त्यामुळे आम्ही बंदची हाक मागे घेतली आहे. मात्र, आमचे कार्यकर्ते प्रत्येक गाव, प्रत्येक शहर आणि प्रत्येक तहसीलच्या मुख्य चौकात काळ्या फिती बांधून शांततेत आंदोलन करतील. कोर्टाने ज्या वेगाने बंदबाबत निर्णय दिला, त्याच वेगाने आरोपींना शिक्षा सुनावण्याचाही निर्णय द्यावा. जनतेला आता आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे की नाही? कारण, बंद पुकारणे व निदर्शने करणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. उद्या आम्ही बंद करणार नाही, केवळ निषेध नोंदवू.

शरद पवार (Sharad Pawar) शुक्रवारी सायंकाळी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की, बदलापूर (Badlapur School Case) घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या.

काँग्रेसकडून बंद मागे घेण्याची घोषणा

काँग्रेस (Congress) न्यायालयाचा सन्मान करणारा पक्ष आहे. आम्ही उद्याचा बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.