CM Majhi Ladki Bahin Yojana : मुंबईत केवळ पाऊण लाख महिलांचेच अर्ज मंजूर

साडेतीन लाखांहून अधिक महिलांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत

515
Majhi Ladki Bahin Yojana च्या नोंदणीला मुदतवाढ
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (CM Majhi Ladki Bahin Yojana) पैसे आता महिलांच्या खात्यात जमा होऊ लागले असून या लाभार्थ्यांमध्ये मुंबईतील महिलांच्या खात्यात पैसे येण्यास विलंब होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये एकूण सव्वा चार लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात यातील सुमारे ७० हजार महिलांचे अर्ज मंजूर झाले असून उर्वरीत महिलांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने या महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास काही दिवस वाट पाहण्याची वेळ येणार आहे.

(हेही वाचा – kolkata Rape &amp Murder Case: ममतांनी PM मोदींना लिहिलेल्या पत्रावरून राजकीय युद्ध: भाजपाने केले ‘हे’ आरोप)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील माता भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (CM Majhi Ladki Bahin Yojana) जाहीर केली असून त्यानुसार महिलांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. आतापर्यंत मुंबई दोन्ही उपनगरांमधून ३ लाख १६ हजार ४४० आणि शहर भागातून १ लाख ०८ हजार ०६३ अर्ज प्राप्त झाले आहे. मात्र, उपनगरांत १०४ आणि शहर भागात ५० अर्ज कायमस्वरुपी बाद झाले आहेत. शहर भागातील १ लाख ०८ हजार ०६३ अर्जांपैकी २० हजार ८११ अर्ज मंजूर झाले असून ७८ हजार ६४८ अर्ज हे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तर उपनगरांमध्ये ३ लाख १६ हजार ४४० अर्जांपैकी ५८ हजार २३४ अर्ज हे मंजूर झाले आहे. तर २ लाख ३५ हजार ३६९ अर्ज हे मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – कांदिवलीत Skill Development Training Center; येत्या तीन वर्षांत दहा हजार युवक युवतींना मिळणार प्रशिक्षण)

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे (CM Majhi Ladki Bahin Yojana) पैसे अनेक महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा झाल्याने महिलांचे आनंदाचे वातावरण आहे. तर अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा न झाल्याने महिला चिंतेत आहेत. त्यामुळे अनेक महिलांना या योजनेचे पैसे जमा होण्यास न झाल्याने या महिला प्रतीक्षेत असून प्रत्यक्षात सुमारे साडेतीन तीन लाखांहून अधिक अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याने मुंबईतील बहुतांशी महिलांना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला आहे. त्यामुळे ३१ तारखेपर्यंत मंजूर होणाऱ्या अर्जांचे पैसे पुढील महिन्यात एकत्रपणे साडेचार हजार रुपये जमा होतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.