Ayushman Bharat : केंद्र सरकारच्या आरोग्य विम्याचा कसा लाभ घ्याल ? काय आहेत पात्रता आणि निकष ?

170
Ayushman Bharat : केंद्र सरकारच्या आरोग्य विम्याचा कसा लाभ घ्याल ? काय आहेत पात्रता आणि निकष ?
  • प्रतिनिधी

आयुष्मान भारत (Ayushman Bharat) योजनेसंदर्भात नागरिकांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळते. या योजनेत जर कोणी आजारी पडले तर त्यांना विमा मिळतो आणि ५ लाखांपर्यंतच्या आजाराचा खर्च या योजनेतून शासन देते. परंतु या योजनेचा लाभ कसा मिळवावा हा बऱ्याच लोकांना माहित नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून (Central Govt) ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ राबविली जात आहे. देशातील कोट्यवधी लोक या योजनेत सहभागी झाले आहेत. या योजनेतून लाभार्थ्याला ५ लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. केंद्राने २०१८ पासून या योजनेला सुरूवात झाली. चला तर आज जाणून घेऊया – आयुष्यमान योजनेचा लाभ कोण घेऊ शकते, लाभार्थ्यांची पात्रता कशी निश्चित होते, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, आयुष्यमान योजनेचे लाभ कसे मिळवायचे.

(हेही वाचा – CM Majhi Ladki Bahin Yojana : मुंबईत केवळ पाऊण लाख महिलांचेच अर्ज मंजूर)

योजनेचा लाभ कसा मिळवावा ?

महाराष्ट्रात आता सर्व नागरिकांसाठी आरोग्य विम्याचा फायदा घेता येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत (MJPJAY) इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. सरकारकडून निर्णय देण्यात आल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या विमा योजनेमुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत १.५ लाख रुपयांचा विमा दिला जात होता, पण हा विमा वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या लोकांसाठी उपलब्ध होता. त्यामुळे अनेकांना या विम्याचा लाभ घेता येत नव्हता. आता मात्र या विम्याच्या योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा असणार नसून सर्वांना याचा लाभ घेता येणार असून त्याची मर्यादा देखील दीड लाखाहून पाच लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही योजना फक्त पिवळे व केशरी शिधापत्रिका असणाऱ्यांनाच मिळत होती.परंतु आता ह्या योजनेची व्याप्ती वाढवत सफेद (शुभ्र) शिधापत्रिका धारकांनादेखील होणार आहे. १ जुलैपासून ५ लाखांचा विमा लागू करण्यात येणार आहे. MJPJAY योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीकडे डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. या दोनपैकी एक कागदपत्र असणं आवश्यक आहे, अन्यथा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

योजनेअंतर्गत १९०० रुग्णालयं, १३५६ आजारांवर उपचार

सध्या या योजनेअंतर्गत १००० रुग्णालयं आहेत. मात्र आता जुलैपासून आणखी ९०० रुग्णालयं जोडली जाणार आहेत. त्यापैकी मुंबईत ५७ रुग्णालयांमध्ये उपचार केले जाणार आहेत. तसंच या विमा योजनेत १३५६ आजार कव्हर होणार आहेत. मूत्रपिंड, यकृत, हृदय आणि इतर अनेक आजारांवर उपचार केले जातील. (MJPJAY)

(हेही वाचा – बदलापूर प्रकरणावरुन Chitra Wagh यांचा महाविकास आघाडीवर प्रहार; म्हणाल्या…)

लाभ मिळविण्यासाठी काय करावे

कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्वात आधी आयुष्मान भारत म्हणजेच प्रधानमंत्री जनआरोग्य योजना PMJAY तसेच MJPJAY ही विमा योजना असलेल्या रुग्णालयात जावं लागेल. रुग्णालयांसंबधित माहिती https://www.jeevandayee.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या साइटवर नेटवर्क हॉस्पिटल या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर जिल्ह्याची निवड केल्यानंतर रुग्णालयांची संपूर्ण यादी इथे मिळेल.

उदाहरणार्थ एखाद्या रुग्णाला डॉक्टरांनी एंजिओप्लास्टी करण्याचा सल्ला दिला असेल, तर डॉक्टर एक फॉर्म आणि पत्र लिहून देतील. तो फॉर्म आणि पत्र रुग्णालयातील ‘रुग्ण मित्र’ इथे द्यावा लागेल. MJPJAY ने रुग्णालयांमध्ये एक कक्ष स्थापन केला असून तिथे ‘रुग्ण मित्र’ रुग्णाचं रजिस्ट्रेशन करतो. तिथेच रुग्णाला रेशन कार्ड किंवा डोमिसाइलची झेरॉक्स द्यावी लागते. त्याशिवाय डॉक्टरकडून लिहून दिलेलं पत्र जोडावं लागतं.रुग्ण मित्राकडून सर्व कागदपत्र ऑनलाइन अपलोड केल्यानंतर MJPJAY कार्यालयात असलेली डॉक्टरांची समिती रुग्णाने डॉक्टरद्वारे भरलेले फॉर्मची छाननी होते. रुग्णाला खरोखरच उपचाराची गरज आहे, असं समितीला वाटल्यास अवघ्या काही तासांत अर्ज स्वीकारून लाभांतर्गत उपचारासाठी मान्यता दिली जाते. (MJPJAY)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.