Education Officer Suspended: निष्काळजीपणाचा ठपका ठेवत मुंबई आणि ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश; शिक्षणमंत्री ॲक्शन मोडवर

143
Education Officer Suspended: निष्काळजीपणाचा ठपका ठेवत मुंबई आणि ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश; शिक्षणमंत्री ॲक्शन मोडवर
Education Officer Suspended: निष्काळजीपणाचा ठपका ठेवत मुंबई आणि ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश; शिक्षणमंत्री ॲक्शन मोडवर

बदलापूर येथील शाळेत (Badlapur school Case) दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत. संबंधित घडलेल्या घटनेबाबत मुंबई महापालिकेच्या शाळांमधील सुरक्षेच्या मुद्द्यावर शहराचे पालकमंत्री आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई केली.  (Education Officer Suspended)

शाळांमध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरा बसवण्यास विलंब झाल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ (Rajesh Kankal) आणि ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे (Balasaheb Rakshe) यांचे देखील निलंबन करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.  (Education Officer Suspended) 

(हेही वाचा – Sangli Congress Rebel : बंडखोर काँग्रेस नेत्याच्या मेळाव्याला ठाकरे सांगलीत)

 एक महिन्याची मुदत

शिक्षणाधिकारी यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत राज्य सरकारने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणी अतिरिक्त आयुक्त डॉ अमित सैनी (Additional Commissioner Dr. Amit Saini) यांनी मध्यस्थी केल्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी एक महिन्याची मुदत दिली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना, म्हणाले… 

शहराचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी महापालिका मुख्यालयात  विविध विकासकामांचा आणि समस्यांचा आढावा घेतला. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास विलंब झाल्याचे सांगत, या प्रकरणी सुरक्षेच्या मुद्दा विचारात घेता महापालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि बाळसाहेब राक्षे यांना निलंबित केले जाईल असे जाहीर केले. (Education Officer Suspended)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.