Byculla Crime : भायखळा येथील खळबळजनक घटना! घरात घुसलेल्या माथेफिरुने ट्युशनसाठी आलेल्या मुलांना ठेवले वेठीस आणि…

548
CBI Action CGST : सीबीआयने मुंबईत लाचखोर सीजीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; तक्रारदाराकडे 30 लाखांची मागणी
CBI Action CGST : सीबीआयने मुंबईत लाचखोर सीजीएसटी अधीक्षकासह दोघांच्या मुसक्या आवळल्या; तक्रारदाराकडे 30 लाखांची मागणी
एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या घरगुती ट्युशन मध्ये घुसलेल्या माथेफिरुने ट्युशन साठी आलेल्या दोन भांवडावर चाकूने हल्ला करून जखमी केले, त्यानंतर या माथेफिरुने आतून घराची कडी लावली घरात तोडफोड करून गॅस सुरू करून घर पेटविण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सायंकाळी दक्षिण मुंबईतील भायखळा माझगाव येथे घडली. भायखळा पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेऊन हल्ल्यात जखमी झालेल्या भावंडाना उपचारासाठी मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भायखळा  पोलीस ठाण्यात या माथेफिरू विरुद्ध हत्येचा प्रयत्न, बळजबरीने घरात प्रवेश करणे, स्वतःला आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे. (Byculla Crime)
लेबांत पटेल (वय ३०) असे असून तो तीन दिवसांपूर्वीच ओरिसातील चिंदगोडा येथून मुंबईत आला होता. तो गेल्या तीन दिवसांपासून सीएसएमटी परिसरात राहत होता. शुक्रवारी(23ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तो भायखळा येथील घोडपदेव परिसरात आला होता, त्याने मराठा कंपाउंड येथे प्रवेश केला, त्याच्या राहणीमान बघून कंपाउंडमधील रहिवाशी तरुणानी त्याला हटकले. घाबरून पटेल हा घरांच्या कौलावर चढला, आणि त्याने आपल्या अंगावरचे शर्ट काढून विचित्र हावभाव करू लागल्यामुळे कंपाउंड मधले तरुण त्याला पकडण्यासाठी लाठ्या काठ्या घेऊन त्याच्या मागे धावू लागले असता या माथेफिरू पटेल याने तेथून पळ काढत जवळच असलेल्या हेरंब दर्शन या इमारतीत शिरला, या इमारतीच्या तळमजल्यावरील एक घर त्याला उघडे दिसले आणि त्याने थेट त्या घरात प्रवेश केला. (Byculla Crime)
हे घर जयश्री गोरडे (Jayshree Gorde) नावाच्या महिलेचे होते, व ती घरातच ट्युशन चालवत होती, हा माथेफिरू घरात शिरला त्यावेळी चार मुले ट्युशनसाठी आले होते, अचानक घरात शिरलेल्या माथेफिरू मुळे मुले आणि जयश्री गोरडे या घाबरल्या व त्यांनी आरडाओरड करताच माथेफिरूने स्वयंपाक घरातून चाकू आणून १० वर्षाची मुलगी आणि ९ वर्षाचा तिचा भाऊ या दोघांवर चाकूने हल्ला करण्यास सुरुवात केली, ९ वर्षाच्या मुलाला वेठीस धरून दार आतून लावून घेत, घरात तोडफोड सुरू केली, त्यानंतर त्याने गॅस सुरू करून  आग लावण्याचा प्रयत्न केला.या घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन  खिडकीतून घरात प्रवेश करून मुलाची सुखरूप सुटका करून माथेफिरूला  ताब्यात घेतले. दोन्ही मुलांची तात्काळ मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आले, दोन्ही मुलाची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून सोडून देण्यात आले आहे, परंतु या घटनेमुळे दोन्ही मुले भयंकर घाबरली आहेत. (Byculla Crime)
भायखळा पोलिसांनी ताब्यात घेतलेला माथेफिरू पटेल हा देखील घरातील तोडफोड करताना काचा लागून जखमी झाला असून त्याच्यावर जेजे रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले आहे. भायखळा पोलिसांनी पटेल याच्याविरुद्ध
हत्येचा प्रयत्न, बळजबरीने घरात प्रवेश करणे, स्वतःला आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली आहे. (Byculla Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.