रविवारी लोकल प्रवासाचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक तपासा आणि नियोजन करुनच घराबाहेर पडा. ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही विलंबाने धावणार आहेत. यामुळे उद्या, रविवारी मुंबईकरांचा तिन्ही रेल्वेमार्गांवर खोळंबा होणार आहे.
मध्य रेल्वे- स्थानक : माटुंगा ते मुलुंड
मार्ग : अप आणि डाऊन जलद
वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५
अप आणि डाऊन जलद मार्गावरील फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही विलंबाने धावतील. (Mega Block)
हार्बर रेल्वे- स्थानक : पनवेल ते वाशी
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल अप-डाऊन , ठाणे ते पनवेल अप-डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत . सीएसएमटी ते वाशी, ठाणे ते वाशी/नेरुळ, बेलापूर/नेरुळ ते उरण मार्गावर लोकल फेऱ्या सुरू राहणार आहे. (Mega Block)
पश्चिम रेल्वे- स्थानक : बोरिवली ते गोरेगाव
मार्ग : अप आणि डाऊन धीमी
वेळ : सकाळी १० ते दुपारी ३
ब्लॉकवेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येतील . यामुळे बोरिवली फलाट क्रमांक १, २, ३, ४ वरून कोणतीही लोकल धावणार नाही. याशिवाय काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, उर्वरित विलंबाने धावणार आहेत. (Mega Block)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community