Badlapur School Case : दोन अल्पवयीन मुलींवर एकदा नाही तर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता, अहवाल काय सांगतो?

193
Badlapur School Case : दोन अल्पवयीन मुलींवर एकदा नाही तर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता, अहवाल काय सांगतो?
Badlapur School Case : दोन अल्पवयीन मुलींवर एकदा नाही तर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता, अहवाल काय सांगतो?

बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर (Badlapur School Case) झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. बदलापूर घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. या समितीच्या प्राथमिक निष्कर्षानुसार बदलापूरमधील त्या अल्पवयीन मुलींवर 15 दिवसांपासून अत्याचार सुरू होते.

१५ दिवसात अल्पवयीन मुलींवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाले
अल्पवयीन मुलीच्या गुप्तभागाला जवळपास 1 इंच इजा झाली असल्याचे अहवालात समोर आले आहे. मागील पंधरा दिवसात अल्पवयीन मुलींवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. 1 ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची कोणतीही पार्श्वभूमी तपासल्याशिवाय भरती करण्यात आली. त्याला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्राशिवाय मोफत प्रवेश होता. त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कोणाच्या शिफारशीने हे शोधण्याची गरज असल्याचे अहवालात म्हटलं आहे. (Badlapur School Case)

ही घटना प्रथम लिपीक यांना समजली होती
बदलापूर प्रकरणात आतापर्यंत SIT ने 17 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात शाळेच्या 10 शिक्षक, 5 सफाई कर्मचारी, 2 लिपिक यांचा समावेश आहे. जबाब नोंदवण्यात आलेल्या शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून तीन जणांचा निष्काळजीपणा समोर येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यात शाळेच्या मुख्यध्यापिका आणि दोन ट्रस्टींची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना प्रथम लिपीक यांना समजली होती. लिपिकांनी याबाबत मुख्यध्यापिकांना सांगितले होते. मात्र घटना कळूनसुद्धा पुढे याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली नसल्याचे तपासात समोर आले आहे. (Badlapur School Case)

अहवालात नेमके काय? (Badlapur School Case)

1) त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तभागाला जवळपास एक इंच इजा झाली आहे.

2) गेल्या पंधरा दिवसांत अल्पवयीन मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता.

3) 1 ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची पार्श्वभूमी न तपासता भरती करण्यात आली.

4) त्याला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्रा-शिवाय सहज प्रवेश होता.

5) त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कोणाच्या शिफारशीने हे शोधण्याची गरज आहे.

6) हे प्रकरण हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवला गेला असून येत्या सात दिवसांत उत्तरे मागवली जातील.

7) शाळा प्रशासन तब्बल 48 तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले.

8) तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही.

9) पीडितेवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला 12 तास लागले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.