Shakib Al Hasan : बांगलादेशचा माजी कर्णधार शकीब अल हसनवर खूनाचा गुन्हा दाखल

Shakib Al Hasan : ढाकातील एका कापड दुकानातील व्यक्तीची हत्या केल्याचा गुन्हा शकीबवर नोंदवण्यात आला आहे 

169
Shakib Al Hasan : शकीब अल हसनचा राग जेव्हा अनावर होतो….
Shakib Al Hasan : शकीब अल हसनचा राग जेव्हा अनावर होतो….
  • ऋजुता लुकतुके

बांगलादेशमधील लोकप्रिय क्रिकेट व्यक्तिमत्व आणि तिथल्या अवामी लीगचा खासदार शकीब अल हसनवर बांगलादेशातच खूनाचा गंभीर गुन्हा लावण्यात आला आहे. ढाक्यातील एका कापड दुकानात झालेल्या जाळपोळ प्रकरणी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याप्रकरणी नवीन सरकारने ही कारवाई केली आहे. यात शकीब बरोबरच माजी पंतप्रधान शेख हसीना (Shakib Al Hasan), अभिनेता फिरदौस अहमद, ओबेगुल कादर आणि इतर १५४ जणांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

(हेही वाचा- हवाई वाहतुकीचा भार ‘सी प्लेन’ करणार हलका; केंद्रीय राज्यमंत्री Murlidhar Mohol यांची माहिती)

३७ वर्षीय शकीब सध्या बांगलादेशी संघाबरोबर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सर्वांवर कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या रुबेल नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप आहे. 5 ऑगस्ट रोजी रुबेलने एडबोरमधील रिंगरोडवरील निषेध मोर्चात भाग घेतला. रॅलीदरम्यान, नियोजित कटाचा भाग म्हणून कोणीतरी जमावावर गोळीबार केला. या गोळीबारात रुबेलच्या छातीत आणि पाठीत गोळी लागली. त्यामुळे 7 ऑगस्ट रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (Shakib Al Hasan)

शाकिब आणि फिरदौस या वर्षी जानेवारीत अवामी लीगच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर त्यांची खासदारकीही काढून घेण्यात आली. (Shakib Al Hasan)

बांगलादेशचा हा स्टार अष्टपैलू खेळाडू मैदानावर आणि मैदानाबाहेर वादांमुळे चर्चेत राहतो. या वर्षी एप्रिलमध्ये त्याची ग्राउंड स्टाफसोबत बाचाबाची झाली होती. त्याचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि मारहाण करण्याची धमकीही दिली. याशिवाय तो मैदानावर विरोधी संघातील खेळाडू आणि पंचांशीही अनेकदा भांडला आहे. (Shakib Al Hasan)

(हेही वाचा- Badlapur School Case : दोन अल्पवयीन मुलींवर एकदा नाही तर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता, अहवाल काय सांगतो?)

वर्षीय अनुभवी खेळाडू शाकिबने बांगलादेशकडून आतापर्यंत ६७ कसोटी, २४७ एकदिवसीय आणि १२९ टी-20 सामने खेळले आहेत. या कालावधीत शाकिबने कसोटीत ४,५०५ धावा केल्या आहेत आणि २३७ बळी घेतले आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाकिबच्या नावावर ७,४७० धावा आणि ३१७ विकेट आहेत. तर आंतरराष्ट्रीय T२० मध्ये त्याने २,५५१ धावा आणि १४९ विकेट घेतल्या आहेत.(Shakib Al Hasan)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.