India vs England Test Series : भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये ५ कसोटी खेळणार

India vs England Test Series : पुढील वर्षी जूनमध्ये हा दौरा पार पडणार आहे 

67
India vs England Test Series : भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये ५ कसोटी खेळणार
India vs England Test Series : भारतीय संघ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये ५ कसोटी खेळणार
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट संघ पुढील वर्षी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघ ५ कसोटींची एक मालिका खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २० जूनपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसह, आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपदाचा नवीन हंगामही सुरू होईल. (India vs England Test Series)

(हेही वाचा- हवाई वाहतुकीचा भार ‘सी प्लेन’ करणार हलका; केंद्रीय राज्यमंत्री Murlidhar Mohol यांची माहिती)

भारतीय संघ गेल्या १७ वर्षांपासून इंग्लिश भूमीवर कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. गेल्या दौऱ्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली भारतीय संघाने २-१ अशी आघाडी मिळवली होती. पण कोविडमुळे मालिकेतील शेवटचा सामना पुढे ढकलण्यात आला होता. २०२२ मध्ये झालेला हा सामना जिंकून इंग्लंडने ही मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. (India vs England Test Series)

भारतीय संघाचा इंग्लंड दौरा

तारीख

ठिकाण

पहिली कसोटी

२० – २४ जून

हेडिंग्ले

दुसरी कसोटी

२ – ६ जुलै

एजबॅस्टन

तिसरी कसोटी

१० – १४ जुलै

लॉर्ड्स

चौथी कसोटी

२३ – २७ जुलै

ओल्ड ट्रॅफर्ड

पाचवी कसोटी

३१ जुलै ते ४ ऑगस्ट

ओव्हल

भारतीय संघाच्या या इंग्लंड दौऱ्यातील पहिली कसोटी २० ते २४ जून दरम्यान हेडिंग्ले येथे, दुसरी कसोटी २ ते ६ जुलै दरम्यान एजबॅस्टन येथे, तिसरी कसोटी १० ते १४ जुलै दरम्यान लॉर्ड्स येथे, चौथी कसोटी ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. २३-२७ जुलै आणि शेवटची कसोटी लंडनमध्ये ३१ जुलै  ते ४ ऑगस्ट दरम्यान खेळली जाईल. (India vs England Test Series)

(हेही वाचा- Badlapur School Case : दोन अल्पवयीन मुलींवर एकदा नाही तर अनेकदा अत्याचार झाल्याची शक्यता, अहवाल काय सांगतो?)

भारतीय संघाने अखेरची कसोटी मालिका २००७ साली इंग्लिश भूमीवर जिंकली होती. जिथे राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३ सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. या मालिकेतील पहिला आणि शेवटचा सामना अनिर्णित राहिला. तर नॉटिंगहॅममध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. (India vs England Test Series)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.