Central Government: पॅरासिटामोलसह १५० पेक्षा अधिक औषधांवर केंद्र सरकारची बंदी

239
Central Government: पॅरासिटामोलसह १५० पेक्षा अधिक औषधांवर केंद्र सरकारची बंदी
Central Government: पॅरासिटामोलसह १५० पेक्षा अधिक औषधांवर केंद्र सरकारची बंदी

केंद्र सरकारने (Central Government) एकूण 150 वेगवेगळी औषधं बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता ताप, अंगदुखी यासारख्या त्रासावर घेतली जाणारी अनेक औषधं मिळणार नाहीत. विशेष म्हणजे सरकारने या औषधांवर तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. बंद करण्यात आलेल्या औषधांची निर्मिती, विक्री, वाहतूक करण्यावरही बंदी असेल. या 150 पेक्षा जास्त औषधांवर संपूर्ण देशात बंदी असेल.

(हेही वाचा –Badlapur Case : बदलापूरच्या घटनेतून काय धडा घ्याल?)

यासंदर्भात एक सविस्तर सूचना जारी करण्यात आली आहे. कॉस्मेटिक्स अॅक्ट 1940 या कायद्यातील कलम ’26 अ’ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रायाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, पॅरासिटामोल (Paracetamol), ट्रामाडोल (Tramadol), टॉरिन आणि कॅफीन यांचे कॉम्बिनेशन असलेल्या औषधी गोळ्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारचे संयोजन असलेले औषध पेनकिलर म्हणून अंगदुखीसाठी घेतल्या जायच्या. (Central Government)\

(हेही वाचा –Mumbai Crime: रक्षकच झाला भक्षक! १७ वर्षीय मुलीवर सुरक्षा रक्षकानेच केला बलात्कार)

सरकारने बंदी घातलेल्या औषधांमध्ये ताप, अंगदुखी अशा सामान्य आजारांसाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचाही समावेश आहे. एसिक्लोफेनॉक 50एमजी + पॅरासिटामोल 125एमजी प्रमाण असणारे औषध आता विकता येणार नाही. यासह मेफेनॅमिक अॅसिड + पॅरासिटामोल इंजेक्शन, सिट्राझीन एचसीएल + पॅरासिटामोल + फेनिलफ्रीन एचसीएल, लेवोसेट्रीजीन + फेनाइलफ्रीन एचसीएल + पॅरासिटामोल, पॅरासिटामोल + क्लोरफेनिरॅमाइन मॅलेट + फेनाईल प्रोपेनॉलामाइन तसेच कॅमिलोफिन डाइहायड्रोक्लोराईड 25एमजी + पॅरासिटामोल 300एमजी घटक असणाऱ्या औषधांच्या गोळ्या निर्माण, विक्री करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. (Central Government)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.