Amit Shah: छत्तीसगडमध्ये दहशतवाद्यांचा होणार खात्मा! जाणून घ्या काय आहे मोदी सरकारची संपूर्ण योजना

135
Amit Shah: छत्तीसगडमध्ये दहशतवाद्यांचा होणार खात्मा! जाणून घ्या काय आहे मोदी सरकारची संपूर्ण योजना
Amit Shah: छत्तीसगडमध्ये दहशतवाद्यांचा होणार खात्मा! जाणून घ्या काय आहे मोदी सरकारची संपूर्ण योजना

छत्तीसगड रायपूरमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (२४ ऑगस्ट) आंतरराज्य समन्वय बैठक सुरू झाली आहे. नक्षलग्रस्त (Naxal-affected Chhattisgarh) समस्या संपवण्यासाठी आणि नक्षलग्रस्त भागातील पुनर्बांधणीसाठी ही बैठक होत आहे. या बैठकीत छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव सहाय (Chhattisgarh CM Vishnu Dev Sahay), उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांच्यासह मुख्य सचिव, पोलिस महानिरीक्षक आणि सात राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. (Amit Shah)

या बैठकीत छत्तीसगड व्यतिरिक्त ओडिसा, झारखंड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव, डीजीपी आणि अधिकारी सहभागी होत आहेत. या आंतरराज्य समन्वय बैठकीत माओवादग्रस्त भागात माओवाद्यांच्या कारवाया थांबवणे आणि संयुक्त कारवाया करण्याच्या रणनीतीवर चर्चा केली जात आहे. (Amit Shah)

(हेही वाचा – Raj Thackeray आक्रमक; महिला अत्याचारांवरील गुन्ह्याचा पाढाच वाचून दाखवला)

जाणून घ्या काय आहे आंतरराज्य समन्वय बैठकीचा अजेंडा

नक्षलग्रस्त राज्यांमधील नक्षलवाद्यांच्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होणाऱ्या हालचालींवर पूर्णपणे नियंत्रण ठेवता येईल, हा या बैठकीचा मुख्य अजेंडा (Naxalite agenda) आहे. या बैठकीदरम्यान ही सात राज्ये आपापल्या राज्यांची रणनीती समजावून सांगतील आणि माहितीची देवाणघेवाण करण्याचे काम करतील.

(हेही वाचा – BCCI Cricket Academy : बीसीसीआयची नवीन क्रिकेट अकादमी इतर खेळातील खेळाडूंसाठीही खुली)

छत्तीसगडमधील हे जिल्हे सर्वाधिक नक्षलग्रस्त आहेत

देशातील एकूण ३८ जिल्ह्यांपैकी छत्तीसगडमधील १५ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. यामध्ये विजापूर, बस्तर, दंतेवाडा, धमतरी, गरीबीबंद, कांकेर, कोंडागाव, महासमुंद, नारायणपूर, राजनांदगाव, मोहला-मानपूर-अंबागड चौकी, खैरागड छूई खान गंडई, सुकमा, कबीरधाम आणि मुंगेली जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच छत्तीसगडमध्ये देशातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हे आहेत. छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या २०२३ च्या आधीच्या दौऱ्यात अमित शाह (Amit Shah) म्हणाले होते की, राज्यात सरकार बनवल्यानंतर सर्वप्रथम नक्षलवादाचा नायनाट करायचा आहे. अशा स्थितीत या बैठकीला त्या आश्वासनाच्या संदर्भात पाहिले जात आहे. 

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.