काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स Sharad Pawar यांना भाव देणार काय?

128
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स Sharad Pawar यांना भाव देणार काय?
  • वंदना बर्वे

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्राबाहेरही आपली ताकद असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु इंडी आघाडीला त्यांचा हा दावा केवळ पोकळपणा वाटत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. दोन्ही राज्यांत विधानभेच्या 90-90 जागा आहेत. काश्मीरात 18 आणि 25 सप्टेंबर तसेच 1 ऑक्टोबर अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तर हरियाणात एकाच वेळी 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांचा निकाल 4 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष काश्मीर विधानसभेची निवडणूक लढण्याची जय्यत तयारी करीत आहे. मागील चार-पाच महिन्यांपासून अजित पवार गट काश्मीरमध्ये सक्रीय झाला आहे. काश्मीरच्या सर्व 20 जिल्ह्यात कार्यकारणी नेमण्यात आली आहे आणि जिल्हा कार्यकारिणीलाच विधानसभेतील उमेदवारांची नावे सुचविण्यास सांगण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महासचिव आणि मुख्य प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना काश्मीरचे प्रभारी बनविण्यात आले आहे. त्यांनीच दोन दिवसांपूर्वी निवडणुकीतील पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनित तटकरे, छगन भुजबळ, पार्थ पवार, धीरज शर्मा यांच्यासह 25 जणांना प्रचारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Assembly Election : आमदार रांजळे यांचे अवघडच ? भाजपामधून बंड, मुंडे ही विरोधात गेले…)

अजित पवार गटाने घेतली ‘एकला चलो’ची भूमिका

अशात, जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत आपणही उमेदवार उतरवावे अशी शरद पवार (Sharad Pawar) यांची इच्छा आहे. आपला पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला तर पक्षांची ताकद महाराष्ट्राबाहेराही आहे असे दिसून येईल असे पवार यांना वाटते. मात्र, स्वबळावर मैदानात उतरावे एवढी ताकद शरद पवार गटाची नाही. अशात ते स्थानिक पक्षाशी हातमिळवणी करून निवडणुकीच्या मैदानात उतरू इच्छितात. काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची आघाडी झाली आहे. या आघाडीत सामील होण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आहे.

यासाठी शरद पवार यांनी राज्यसभेच्या खासदार डॉ. फौजीया खान यांना काश्मीर दौऱ्यावर पाठविले आहे. आज त्या माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची भेट घेणार आहेत. शरद पवार किमान चार-पाच जागांवर आपले उमेदवार उतरवू इच्छितात. मात्र काश्मीरात काहीच ताकद नसलेल्या शरद पवार यांच्या पक्षाला काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आघाडीत सामील करून घेतील काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजित पवार यांच्या गटाने ‘एकला चलो’ची भूमिका घेतली आहे. पुलवामा जिल्ह्यात विधानसभेच्या चार जागा आहेत. यातील तीन मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली असल्याची चर्चा आहे. याबाबत श्रीवास्तव यांना विचारले असता ते म्हणाले की,’ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जास्तीत जास्त जागा स्वबळावर लढण्याची तयारी करीत आहे. उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल’.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.