Jammu Kashmir Terrorism: सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

145
Jammu Kashmir Terrorism: सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार
Jammu Kashmir Terrorism: सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) सोपोरच्या रफियााबादमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी मारला गेला. सोपोर पोलीस आणि ३२ राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम हाती घेतली आहे. या भागात आणखी दहशतवादी असण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. (Jammu Kashmir Terrorism)

(हेही वाचा – Assembly Election : आमदार रांजळे यांचे अवघडच ? भाजपामधून बंड, मुंडे ही विरोधात गेले…)

जम्मू-काश्मीर येथे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांसह लष्कर दहशतवाद्यांना शोधून त्यांना ठार करण्यासाठी शोध मोहीम राबवत आहे. सोमवारी (१९ ऑगस्ट), डुडूच्या चील भागात दहशतवाद्यांनी गस्ती पथकार गोळीबार केला, ज्यामध्ये CRPF निरीक्षक कुलदीप कुमार (CRPF Inspector Kuldeep) शहीद झाले.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलात वाढ

जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. येथे होणाऱ्या निवडणुकीत कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत निमलष्करी दलाच्या सुमारे ३०० पथकं तैनात करण्यात आले आहेत. (Jammu Kashmir Terrorism)

(हेही वाचा – Amit Shah: छत्तीसगडमध्ये दहशतवाद्यांचा होणार खात्मा! जाणून घ्या काय आहे मोदी सरकारची संपूर्ण योजना)

जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत शेजारी देश पाकिस्तानकडून सुरू असलेल्या सर्व कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलांकडून सातत्याने शोध मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत, गुरुवारी (२२ ऑगस्ट) संध्याकाळी, नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून भारतीय सीमेत घुसलेल्या एका पाकिस्तानी घुसखोराला सुरक्षा दलांनी अटक केली. अझहर नावाच्या या घुसखोराला नियंत्रण रेषेवर ‘चाकण दा बाग’जवळ पकडण्यात आले.

हेही वाचा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.