- विशेष प्रतिनिधी
बंद म्हटला म्हणजेच बंद…दुकानांची शटर डाऊन व्हायला पाहिजे… शिवसेनेने बंदची हाक दिली म्हणजे दुकान उघडण्याची हिंमत नाही, असा दरारा असलेल्या यूबीटी शिवसेनेचा (UBT Shiv Sena) मुंबईसह दराराच संपला आहे. शिवसेनेला, भाजपाने संपवले अशाप्रकारचा जो काही आरोप केला जातो, त्यापेक्षा आता उबाठा शिवसेनेची ताकद भाजपापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संपवत असल्याचे शनिवारी महाराष्ट्र बंदची घोषणा केल्यानंतर तो निर्णय मागे घेण्याची नामुष्की शिवसेनेवर ज्याप्रकारे आली आहे, ते पाहता शिवसेनेला आता कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होऊ देणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयातील घटनेचा निषेध करण्यासाठी विकृती विरुद्ध संस्कृती विरोधात लढा देण्यासाठी उबाठा शिवसेनेच्यावतीने शनिवारी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्यावतीने हा बंद यशस्वी केला जाईल अशी घोषण उबाठा शिवसेनेचे (UBT Shiv Sena) प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते संजय राऊत यांनी केली. परंतु त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन हा बंद दुपारी दोन वाजेपर्यंत केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. पण या बंदला प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बंद मधून माघार घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाच्यावतीनेही बंद मधून काढता पाय घेतल्याने अखेर संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हा बंद होणार नसून त्याऐवजी मुक निदर्शने केली जातील असे घोषित केले.
(हेही वाचा – शिवसेना खासदार Naresh Mhaske यांनी राहुल गांधींकडे केली ‘ही’ मागणी)
उद्धव ठाकरेंवर आली नाकी तोंडी पडण्याची वेळ
मात्र, या बंदची घोषण महाविकास आघाडीच्यावतीने उबाठा शिवसेनेने (UBT Shiv Sena) केले असल्याचा दावा केला असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या डिक्शनरीमध्ये बंद हा शब्दच नसल्याने त्यांचा या महाराष्ट्र बंदला पाठिंबा कसा प्रश्न निर्माण होत होता, त्याच आदल्या दिवशीच या दोन्ही पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने उद्धव ठाकरे यांना नाकी तोंडी पडण्याची वेळ आली आणि त्यांना माघार घ्यावा लागला, असे बोलले जात आहे. महाविकास आघाडीत उबाठा शिवसेना हा मोठा पक्ष नसून आम्ही त्यांच्यासोबत नाही, तर ते आमच्यासोबत असल्याचे हा बंदचा निर्णय मागे घेत भाग पाडले.
जर हा बंद यशस्वी झाल्यास त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना होईल आणि उबाठा शिवसेनेची ताकद वाढेल याच भीतीने शरद पवार अणि त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी बंद मधून माघार घेण्याची खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीत जो निर्णय घेतला जातो आघाडी म्हणून घेतला जातो, कुठलाही पक्ष परस्पर घोषणा करू शकत नाही, हा एकप्रकारचा संदेशही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा – Sexual Assault : बदलापूरची नायगावमध्ये पुनरावृत्ती; शाळेच्या कँटिंगमध्ये काम करणाऱ्याकडून ७ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार)
या कारणामुळे संपातून माघार
महाविकास आघाडीमध्ये उबाठा शिवसेना (UBT Shiv Sena) पक्ष सामील झाला आहे. पण उबाठाला दोन्ही पक्षांचे ऐकावे लागेल. उबाठाचे ऐकायला हे दोन्ही पक्ष बांधिल नाहीत हाही संदेश एकप्रकारे देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील मूळ पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्याचे बोलले जात आहे.
यापूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२१मध्ये भारत बंदची घोषणा करण्यात आली. याला महाविकास आघाडीने पूर्ण पाठिंबा देत कडकडीत बंद पाळण्याचा प्रयत्न केला. परंतु हा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा होता आणि केंद्राच्या विरोधात असल्याने उबाठा शिवसेनेने (UBT Shiv Sena) पाठिंबा होता. परंतु यावेळी उबाठा शिवसेनेने स्वत:च ही घोषणा केल्याने आणि आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उबाठाला पुन्हा मोठ्या आत्मविश्वासाने उभे करू द्यायचे नसल्याने या संपातून माघार घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मागील अनेक वर्ष बंद सम्राट म्हणून आपला दरारा आणि भीती निर्माण करणाऱ्या उबाठा शिवसेनेची महाराष्ट्र बंद करण्याची असली नसलेली ताकदच आता महाविकास आघाडीने संपवल्याची चर्चा आता सर्वांच्या मुखातून ऐकायला येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community