Water Supply : पवईतील ‘त्या’ जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण, पाणीपुरवठा होणार सुरळीत

1541
Water Supply : पवईतील 'त्या' जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण, पाणीपुरवठा होणार सुरळीत
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिकेच्या तानसा (पश्चिम) मुख्‍य जलवाहिनीला पवई येथे शुक्रवारी (२३ ऑगस्‍ट २०२४) रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक मोठी गळती लागल्‍यानंतर यातून हजारो लिटर पाणी वाहून गेले होते. त्यानंतर महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्यावतीने तातडीने दुपारी दीड वाजता दुरुस्तीचे काम हाती घेतले. हे काम शनिवारी दुपारी एक वाजता पूर्ण झाले असून संध्याकाळच्या वेळेत होणाऱ्या विभागांमध्ये पाणीपुरवठा करण्यात आला आहे. (Water Supply)

New Project 96

(हेही वाचा – T20 Super Over : एकाच टी-२० सामन्यात ३-३ सुपर ओव्हर, देशांतर्गत सामन्यात नवीन विक्रम)

पवई येथे आरे वसाहतीजवळच्‍या गौतम नगर परिसरात १८०० मिलीमीटर व्यासाच्‍या तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे कामकाज युद्ध पातळीवर हाती घेतल्याने एच-पूर्व, के-पूर्व, जी-उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. तयामुळे अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहिला तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला होता. या मुख्य जलवाहिनीतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद केल्यांनतर दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर जलवाहिनीतील गळतीचा भाग वेल्डींग करून दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यांनतर यातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला आहे. (Water Supply)

New Project 97

(हेही वाचा – काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स Sharad Pawar यांना भाव देणार काय?)

तब्बल २४ तासांच्या प्रयत्नानंतर हे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि उपायुक्त यतीन दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्या नेतृत्वाखाली ५० कामगार, ४ दुय्यम अभिंयंता, ३ कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या टिमने वेळेत या दुरुस्तीचे काम मुंबईकरांचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. (Water Supply)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.