North East Mumbai Lok Sabha Constituency : कोटेचांचे पाय जमिनीवर…

181
North East Mumbai Lok Sabha Constituency : कोटेचांचे पाय जमिनीवर…
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातील (North East Mumbai Lok Sabha Constituency) भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचा पराभव झाला. मात्र, या निवडणुकीत कोटेचा यांनी भाजपाचे माजी खासदार मनोज कोटक आणि किरीट सोमय्या यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता स्वत:ची यंत्रणा वापरुन प्रचार केला. त्यामुळे स्थानिक नेतृत्वालाच किंमत न देता कोटेचा हे हवेत असल्याप्रमाणे वागत असल्यानेच त्यांचा पराभव झाल्याचे बोलले जात असतानाच या पराभवानंतर मात्र त्यांचे पाय जमिनीवर आल्याचे पहायला मिळत आहे.

(हेही वाचा – UBT Shiv Sena ला उभे होण्यापूर्वीच पाडले, ताकदच संपवली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने!)

मुलुंडचे भाजपाचे आमदार मिहिर कोटेचा यांना ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची (North East Mumbai Lok Sabha Constituency) उमेदवारी भाजपाच्यावतीने देण्यात आली होती. तर उबाठा शिवसेनेच्यावतीने संजय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत कोटेचा यांचा पराभव झाला आणि संजय पाटील हे विजयी झाले. मात्र, लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने हवेत वावरणाऱ्या कोटेचा यांच्यामुळे भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. आजवर या मतदार संघात संघटनात्मक निवडणूक लढवली गेली, परंतु याच वेळेला स्थानिक पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता आपल्याच यंत्रणेद्वारे प्रचार केल्यामुळे ही नाराजी अधिक पसरली होती. भाजपाच्या मतदारांनी मतदान केले असले तरी प्रत्यक्षात कोटेचा यांचा पराभव झाल्यानंतर या पराभवाचे खापर कोटेचा यांच्यावर फोडण्यात येत होते.

(हेही वाचा – Water Supply : पवईतील ‘त्या’ जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण, पाणीपुरवठा होणार सुरळीत)

परंतु आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोटेचा यांचे पाय आता जमिनीवर आले आहेत. शनिवारी मुलुंड पूर्व भागातील पाच इमारतींच्या सोसायटींमध्ये पेव्हर ब्लॉक आणि सुशोभिकरणाची कामांचा शुभारंभ करण्यात आला. या आमदार निधीतून करण्यात येणाऱ्या शुभारंभाच्या कार्यक्रमात पोस्टरवर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह माजी खासदार किरीट सोमय्या आणि मनोज कोटक यांची छायाचित्रे दिसून आली. तसेच रविवारीही मुलुंड पूर्व मधील पाच इमारती सोसायटींमधील पेव्हर ब्लॉक व सुशोभिकरणाची कामांचा शुभारंभ करण्यात येणर आहे, त्या पोस्टरवरही कोटक आणि सोमय्यांची छायाचित्रे होती. त्यामुळे कोटक आणि सोमय्यांचे फोटो आता लावले जात असल्याने कोटेचा यांचे पाय आता जमिनीवर आल्याची चर्चा मुलुंड भागांत ऐकायला येत आहे. (North East Mumbai Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.