… म्हणुन पुण्यातील Mercedes-Benz प्लांटला महाराष्ट्र सरकारकडून बजावली नोटीस

139
... म्हणुन पुण्यातील Mercedes-Benz प्लांटला महाराष्ट्र सरकारकडून बजावली नोटीस
... म्हणुन पुण्यातील Mercedes-Benz प्लांटला महाराष्ट्र सरकारकडून बजावली नोटीस

पुण्यातल्या मर्सिडीज बेंज (Mercedes-Benz) या कंपनीला महाराष्ट्र सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Government of Maharashtra Pollution Control Board) नोटीस पाठवली आहे. प्रदूषणा संदर्भातली नियमावली पाळत नसल्याने कंपनीला नोटीस पाठवण्यात आली आहे. पुण्यातील चाकण येथील मर्सिडीज असेम्बली प्लांटविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. नियमित निरीक्षणादरम्यान ही विसंगती आढळनू आली.

(हेही वाचा –Telegram ॲपचे CEO पावेल डुरोव यांना अटक)

MPCB ने सांगितलं की, त्यांनी विभागीय कार्यालयांना कारवाईचे निर्देश दिली आहेत. याशिवाय त्यांनी कंपनीची 25 लाखांची बँक गॅरंटी जप्त केली. एमपीसीबीने आपल्या प्रादेशिक अधिका-यांना परिस्थिती सुधारण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये प्लांटच्या कामकाजाचा सखोल आढावा आणि आवश्यक सुधारात्मक उपायांची अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे. (Mercedes-Benz)

(हेही वाचा –‘मी उत्सुक आहे’, PM Modi यांचे जळगाव दौऱ्यापूर्वी मराठीतून ट्वीट)

मर्सिडीज बेंज इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मर्सिडीज बेंज भारतात गेल्या 30 वर्षांपासून व्यवसाय करीत आहे. चाकणमधील अत्याधुनिक सुविधा देशातील ऑटोमोबाइल वाढीसाठी एक बेंचमार्क आहे. कंपनीकडून उत्पादन गुणवत्तेस कठोर जागतिक मानकांचे पालन केले जाते. मर्सिडीज-बेंज-इंडियाने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलं की, अद्याप तरी MPCB कडून कथित उल्लंघनाबाबत लिखित नोटीस मिळालेली नाही. (Mercedes-Benz)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.