- ऋजुता लुकतुके
सुरुवातीला एंजल ब्रोकर (Angel One Share Price) या नावाने प्रसिद्ध असलेली आणि २०२० मध्ये एंजल वन नावाने आयपीओ निघालेली ही कंपनी पहिले धक्के पचवून आता शेअर बाजार गुंतवणुकीतील रिटेल सेवा पुरवणारी ब्रोकरेज संस्था म्हणून देशात नावारुपाला आली आहे. कंपनीचा आयपीओ काही फारसा आशादायक नव्हता. कोव्हिड नंतरच्या त्या काळात कंपनीची सुरुवातीला पिछेहाट झाली. शेअरही नोंदणीच्या १०० टक्के खाली आला.
(हेही वाचा- Shri Krishna Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व आणि श्रीकृष्णाची उपासना)
कोव्हिड आणि पाठोपाठ अदानी – हिंडेनबर्ग वादळामुळे कोसळलेला शेअर बाजार जसा सावरला, तसतसं कंपनीनेही शेअर बाजारात पुन्हा आपलं स्थान मिळवलं आहे. ऑगस्ट महिन्यात तर या शेअरने पुन्हा एकदा उसळी घेतल्याचं चित्र दिसत आहे. (Angel One Share Price)
शुक्रवारी शेअर बाजार बंद झाले तेव्हा एंजल वन कंपनीचा शेअर आठवड्या भराच्या उसळीनंतर काहीसा घसरला. पण, ही घसरण नफारुपू विक्रीची होती. शुक्रवारी राष्ट्रीय शेअर बाजारात १.८२ टक्क्यांच्या घसरणीनंतर शेअर २,५६९ वर बंद झाला होता. (Angel One Share Price)
पण, गेल्या महिनाभरातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे हा शेअर मूळातच तेजीत आहे. गेल्या सात दिवसांत कंपनीच्या शेअरमध्ये २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीला ऑगस्ट महिन्यात कुठल्या गोष्टींनी तारलं आहे ते पाहूया, (Angel One Share Price)
ऑगस्ट महिन्यातील सकारात्मक बातम्या
मागच्या वर्षभरात पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये कंपनीने ढळढळीत यश मिळवलं असून जून २०२३ ते जून २०२४ या कालावधीत कंपनीच्या ग्राहकांमध्ये तब्बल ६४ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही संख्या जून २०२४ पर्यंत २६ दशलक्ष लोकांपर्यंत गेली आहे. तर कंपनीच्या ग्राहकांना गुंतवणुकीतून झालेला नफाही घसघशीत वाढला आहे. जून २०२३ च्या तुलनेत यात ८२ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही आकडेवारी आणि कंपनीची कामगिरी बाहेर आल्यावर कंपनीच्या शेअरमध्येही ऑगस्ट महिन्यात वाढ दिसून आली. (Angel One Share Price)
(हेही वाचा- Uddhav Thackeray : ‘मातोश्री’चा धाक गेला कुठे?)
मुख्य जोखीम अधिकारी
कंपनीने अलीकडे मनमोहन सिंग यांची मुख्य जोखीम अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पोर्टफोलियोतील जोखीम किती असावी आणि ती कशी संतुलित करता येईल यावर कंपनी आणि नवीन अधिकारी म्हणून सिंग काम करत आहेत. याचा कंपनीला पोर्टपोलिओ व्यवस्थापनातही उपयोग झाला आहे. अशा प्रकारची सेवा ग्राहकांनाही पसंत पडल्याचं दिसत आहे. त्यातूनच कंपनीचा शेअरही वधारला आहे. (Angel One Share Price)
शेअर, कमोडिटी आणि चलन बाजारात कंपनी ब्रोकरेज फर्म म्हणून काम करते. (Angel One Share Price)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community