Dahi Handi 2024 : ठाण्यात 55 लाखांची गोकुळ हंडी वेधणार लक्ष

153
Dahi Handi 2024 : ठाण्यात 55 लाखांची गोकुळ हंडी वेधणार लक्ष
Dahi Handi 2024 : ठाण्यात 55 लाखांची गोकुळ हंडी वेधणार लक्ष

मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही ठाण्यात शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या गोकुळहंडीची धूम पाहायला मिळणार आहे. भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील (Krishna Patil) यांच्याकडून या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. (Dahi Handi 2024)

(हेही वाचा- Russia Ukraine War : रशियात ‘9/11’, युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोन हल्ला! धक्कादायक Video समोर)

गोकुळ दहीहंडी ही ठाण्यातील एक प्रतिष्ठित दहीहंडी बनली असून यामध्ये एकूण 55 लाखांची बक्षिसे आयोजकांकडून जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5 लाख 55 हजार 555 रोख रक्कम व चषक बक्षीस दिले जाणार असून पुढील प्रत्येक नऊ थरास रुपये 3 लाख 33 हजार 333 रुपये रोख रक्कम व चषक बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. ठाण्याची हंडी 2 लाख 22 हजार 222 रुपये व चषक त्याचबरोबर मानाची गोकुळ हंडी महिला गोविंदा पथकास एक लाख 11 हजार 111 व चषक अशी रक्कम बक्षीस दिली जाणार आहे. याशिवाय आठ थराची सलामी 51 हजार व चषक,सात थराची सलामी 12000 व चषक, सहा थराची सलामी 9000 व चषक, पाच थराची सलामी 5000 व चषक, चार थराची सलामी 3000 व चषक, अशी बक्षिसे पुरुष गटासाठी असून सात थराची सलामी 25000 व चषक, सहा थराची सलामी 15000 व चषक, पाच थराची सलामी दहा हजार व चषक, चार थराची सलामी 3000 चषक अशी बक्षिसे महिलांसाठी ठेवण्यात आली आहेत. (Dahi Handi 2024)

मागील वर्षी या दहीहंडीच्या निमित्ताने अर्जुन पुरस्कार विजेते त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कार विजेते, व अन्य क्षेत्रातील क्रीडापटूंचा सत्कार करण्याचा अनोखा सामाजिक उपक्रम आयोजकांनी राबवला होता. यावर्षीही ठाण्याच्या हिताचे सामाजिक उपक्रम या दहीहंडीच्या निमित्ताने राबवले जातील असे आयोजक कृष्णा पाटील यांनी सांगितले आहे. (Dahi Handi 2024)

(हेही वाचा- Mumbai-Goa Highway गणेशोत्सवापूर्वी खड्डे मुक्त होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिल्या सूचना)

ठाण्याच्या मूलभूत नागरिक समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या दहीहंडीच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे कृष्णा पाटील यांनी सांगितले. गोकुळ दहीहंडी ही हिंदू सणांचे प्रतीक बनतानाच तरुणाईचा उत्साह आणि शहराच्या सामाजिक बांधिलकीची जाणीव याची सांगड घालणारी अनोखी दहीहंडी ठरेल असेही कृष्णा पाटील म्हणाले. (Dahi Handi 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.