SBI Clerk Salary : स्टेट बँकेच्या कारकूनाला महिन्याला किती पगार असतो? त्याची निवड कशी होते?

SBI Clerk salary : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बँकांची भरती परीक्षा होणार आहे

108
SBI PO Salary : स्टेट बँकेत परिविक्षाधीन अधिकारी (PO) म्हणून किती असतो पगार?
SBI Clerk Salary : स्टेट SBI PO Salary : स्टेट बँकेत परिविक्षाधीन अधिकारी (PO) म्हणून किती असतो पगार?कारकूनाला महिन्याला किती पगार असतो? त्याची निवड कशी होते?
  • ऋजुता लुकतुके

जून महिना सुरू झाला की, साधारणपणे देशात स्पर्धा परिक्षांचा मौसमही सुरू होतो. यातील एक परीक्षा आहे ती बँक भरती परीक्षा. यंदाही स्टेट बँक तसंच इतर राष्ट्रीयीकृत बँकांमधील कारकून पदावरील नेमणूका या ऑगस्ट महिन्यातच पार पडणार आहेत. स्टेट बँकेत काम करण्यासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते, कारकूनाला पगार नेमका किती असतो, त्यासाठी पात्रता काय लागते, हे समजून घेऊया. (SBI Clerk Salary)

(हेही वाचा- Thane – Borivali Subway मार्गाच्या कामात ठाणे महापालिकेचे सर्वतोपरी सहकार्य)

भारतीय सरकारी बँकांमधील पद नियुक्तीसाठी इंडियन बँकिंग पेरसोनेल इन्स्टिट्यूशन अर्थात, आयबीपीएस ही संस्था पदभरती कार्यक्रम राबवत असते. प्रथम लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखत असं या परिक्षेचं स्वरुप असतं. स्टेट बँकेतील कारकून किंवा असोसिएट ग्राहक सेवा कर्मचारी या पदासाठी मूलभूत पगार हा रुपये २४,०५० इतका आहे. पण, त्यात इतर भत्ते मिळून ३९,००० रुपयांवर जातो. पगाराची फोड समजून घेऊया, (SBI Clerk Salary)

स्टेट बँकेतील कारकून पदावरील उमेदवाराला मिळणारा पगार (२०२४)

मूलभूत पगार

२४,०५०

महागाई भत्ता (१५.७३%)

३,७८३

विशेष भत्ता

७,०८३

विशेष महागाई भत्ता

१,११४

घरभाडे भत्ता

२,७३९

प्रवास भत्ता

८५०

टीएडीए

१३१

एकूण पगार

३९,७५४

या एकूण पगारातून निवृत्ती वेतन फंडासाठी २,८८६ रुपये काढूनही घेतले जातात. ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवणं हे बँक कारकूनाचं महत्त्वाचं काम आहे. तसंच दिवसभरात बँक शाखेत झालेल्या व्यवहारांच्या नोंदी ठेवणं आणि वेळोवेळी त्यांचा अहवाल तयार करून तो शाखा प्रमुखांना सादर करणं, हे आणखी एक महत्त्वाचं काम आहे. येणाऱ्या ग्राहकांना बँकांच्या विविध योजना समजावून सांगणं आणि त्यांचा फायदा त्यांना मिळवून देणं हे कामही कारकूनांना करावं लागतं. बँकांच्या विविध विभागांत कारकूनाला नेमून दिलेली कामं वेगवेगळी असू शकतात. कारकून हा शाखा प्रमुखांच्या हाताखाली त्यांच्या सल्ल्याप्रमाणे कामं करतो. (SBI Clerk Salary)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.