जम्मू काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. या यादीत पहिल्या टप्प्यात १५ आणि दुसऱ्या टप्प्यात १० तर तिसऱ्या टप्प्यातील १९ उमेदवारांची घोषणा केलीय. जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. भाजपने 44 उमेदवारांची यादी जाहीर केलीय, यात 14 मुस्लिम उमेदवारांची नावे आहेत. ९० जागांसाठी जम्मू काश्मीरमध्ये जवळपास दहा वर्षांनी पहिल्यांदा निवडणूक होत आहे.
(हेही वाचा –Russia Ukraine War : रशियात ‘9/11’, युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोन हल्ला! धक्कादायक Video समोर)
रविवारी झालेल्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समिती बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि समितीचे इतर सदस्य सहभागी झाले होते. निवडणूक आयोगाने आगामी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक २०२४ च्या उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली. (Jammu & Kashmir)
(हेही वाचा –kolkata rape case आरोपी संजयने दिली गुन्ह्याची कबुली; म्हणाला, “घटनेपूर्वी रेड लाइट एरियात…”)
भाजपने एकूण ४४ उमेदवारांची पहिली यादी जारी केलीय. पक्षाने राजपोरा इथून अर्शीद भट, शोपियातून जावेद अहमद कादरी, अनंतनाग पश्चिममधून मोहम्मद रफीक वानीला मैदानात उतरवलंय. तर अनंतनागमधून सय्यद वजाहर, किश्तवाडमधून शगुन परिहार, डोडात गजय सिंह राणा यांना उमेदवारी दिली आहे. (Jammu & Kashmir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community