World Test Championship : इंग्लंड, बांगलादेशच्या विजयामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठे बदल

World Test Championship : कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पहिले दोन संघ विजेतेपदासाठी झुंजतात.

125
World Test Championship : इंग्लंड, बांगलादेशच्या विजयामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठे बदल
  • ऋजुता लुकतुके

सध्या इंग्लंड आणि श्रीलंका तसंच पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश असा दोन कसोटी मालिका सुरू आहेत. मालिकांमधील सनसनाटी विजयांमुळे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत मोठे बदल होताना दिसून येत आहे. खासकरून इंग्लंडच्या विजयानंतर त्यांनी मोठी झेप घेतली असून पहिल्या तीन संघांसमोर आव्हान उभं केलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात (World Test Championship) श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव करून इंग्लंडने भारतासह अनेक संघाची डोकेदुखी वाढली आहे.

इंग्लिश संघाने कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ च्या गुणतालिकेत बदल घडवून आणले आहेत. या विजयासह संघाने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. पुढील कसोटीसह त्यांनी मालिका जिंकल्यास ते सहज दुसऱ्या स्थानापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे भारतासह आघाडीच्या ऑस्ट्रेलियाचीही डोकेदुखी वाढली आहे.

(हेही वाचा – kolkata rape case आरोपी संजयने दिली गुन्ह्याची कबुली; म्हणाला, “घटनेपूर्वी रेड लाइट एरियात…”)

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर होता. या सामन्यात इंग्लंडने पाच गडी राखून विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या स्थानावर गेला आहे. इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धची दुसरी कसोटी जिंकल्यास त्याचे रँकिंग आणखी मजबूत होईल. इंग्लंडच्या विजयामुळे श्रीलंका आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचे प्रत्येकी १ स्थान खाली आले आहे.

चौथ्या क्रमांकावर असलेला श्रीलंकेचा संघ पाचव्या स्थानावर तर दक्षिण आफ्रिका ६ सामन्यात २ विजय, ३ पराभव आणि १ ड्रॉसह सहाव्या स्थानावर आहे. पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान ५ सामन्यात २ विजय आणि ३ पराभवांसह सातव्या स्थानावर आहे. बांगलादेश आठव्या आणि वेस्ट इंडिज नवव्या स्थानावर आहे. (World Test Championship)

(हेही वाचा – शाळांमध्ये, महिलांकडे आता पॅनिक बटण येणार? Deepak Kesarkar यांची महत्त्वाची माहिती)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या गुणतालिकेत भारतीय संघ सध्या अव्वल स्थानावर असून ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या, इंग्लंड चौथ्या आणि श्रीलंका पाचव्या स्थानावर आहे. २०२३ ते २०२५ च्या जून महिन्यापर्यंतचे कसोटी सामने या स्पर्धेसाठी गृहित धरले जातात. आणि प्रत्येक विजयासाठी गुण दिले जात असले तरी विजयाची टक्केवारी यात महत्त्वाची आहे. दोन वर्षांच्या कॅलेंडरमध्ये यशाची टक्केवारी सर्वाधिक असलेले दोन संघ अंतिम फेरीत एकमेकांशी भिडतात. यंदा २०२५ मध्ये जून महिन्यात ऑस्ट्रेलियात अंतिम फेरी रंगणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.