बदलापुरातील (Badlapur Child Abuse) चिमुरडीवर झालेल्या लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना देखील आरोपी करण्यात आले असून ते फरार असल्याची माहिती आहे. (Badlapur School Case)
आरोपीला आजन्म कारावास होऊ शकतो
बदलापुरातील शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे (Accused Akshay Shinde) याची सोमवार (२६ ऑगस्ट) रोजी पोलीस कोठडी संपली. त्यामुळे त्याला कल्याण न्यायालयात (Kalyan Court) हजर करण्यात आले. यावेळी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Akshay Shinde 14 days judicial custody) सुनावण्यात आली आहे. याशिवाय या प्रकरणातील कलमांमध्ये वाढ केली असून कलम ६ आणि २१ वाढवण्यात आले आहे. यात २० वर्षे किंवा आजन्म कारावास होऊ शकतो.
(हेही वाचा – शाळांमध्ये, महिलांकडे आता पॅनिक बटण येणार? Deepak Kesarkar यांची महत्त्वाची माहिती)
शाळेच्या मुख्यध्यापिका फरार
तसेच या शाळेच्या मुख्याध्यापिका, संस्थेचे अध्यक्ष, आणि सेक्रेटरी यांना आरोपी करण्यात आले असून ते फरार आहेत. त्यांना या प्रकरणात कधी ही अटक होण्याची शक्यता आहे. आरोपी अक्षय शिंदेला मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.
आरोपी अक्षय शिंदेंचं नेमकं प्रकरण काय ?
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील नामांकित शाळेत (Aadarsh School Badlapur) दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. बदलापूरमधील नामांकित शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली. वय ४ आणि ६ वर्षांच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला होता. या दोन्ही चिमुकल्या मुली लघुशंकेसाठी जात असताना, शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने त्या दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
(हेही वाचा – kolkata rape case आरोपी संजयने दिली गुन्ह्याची कबुली; म्हणाला, “घटनेपूर्वी रेड लाइट एरियात…”)
कल्याण न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांपर्यंत म्हणजेच ९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यासोबतच याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे. तसेच पॉक्सो गुन्ह्यात काही कलम वाढवण्यात आली आहेत. (Badlapur School Case)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community