- प्रतिनिधी
हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीची (Haryana Assembly Elections) घोषणा झाल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांच्या सूनबाई किरण चौधरी या प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) लगेचच त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. चौधरी यांनी आता काँग्रेस नेते भूपेंद्र हुड्डा आणि त्यांचे पुत्र दीपेंद्र हुड्डा यांच्यावर टीका केली असून हरियाणातील काँग्रेस पक्ष केवळ पिता आणि पुत्राचा पक्ष झाला असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे. किरण चौधरी यांच्या समवेत त्यांच्या कन्या श्रुती चौधरीही भाजपामध्ये दाखल झाल्या आहेत. भाजपाने किरण चौधरींना आता राज्यसभेची उमेदवारी दिली असून किरण यांचे राज्यसभेवर निवडून जाणे जवळपास निश्चित असल्याचे मानले जात आहे.
(हेही वाचा – केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय! केंद्रशासित Ladakh मध्ये ५ नव्या जिल्ह्यांची निर्मिती)
काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता
किरण यांनी काँग्रेस सोडली तेव्हा त्यांनी हुडा पिता-पुत्राचे थेट नाव घेत त्यांना लक्ष्य केले होते. तसेच पक्षाला रामराम केला होता. मात्र आता टीका करताना त्यांनी हुड्डांचे नाव घेतले नाही. लोकसभा निवडणुकीत हरियाणात काँग्रेसची ताकद निश्चितच वाढली आहे. तथापि, किरण चौधरी यांनी पक्ष सोडल्यामुळे ज्या भागात माजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांचा प्रभाव आहे तेथे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.
एका इंग्रजी वर्तमान पत्राला दिलेल्या मुलाखतीत चौधरी म्हणाल्या की, हरियाणात काँग्रेस नावाची कोणती वस्तूच नाही. येथे केवळ पिता आणि पुत्राचे चालते. जो कोणी पक्षात मोठे होण्याचा प्रयत्न करतो त्याची उंची कमी केली जाते. हे दोघे पिता-पुत्र स्वतःला पक्षात असुरक्षित मानतात. भूपेंद्र हुड्डा यांना आपल्या मुलासाठी मैदान मोकळे करायचे आहे. (Haryana Assembly Elections)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community