Badlapur School Case : बदलापूरच्या ‘त्या’ शाळेतील १५ दिवसांचं CCTV फुटेज गायब, शिक्षणमंत्र्यांची माहिती

120
Badlapur School Case : बदलापूरच्या 'त्या' शाळेतील १५ दिवसांचं CCTV फुटेज गायब, शिक्षणमंत्र्यांची माहिती
  • प्रतिनिधी

बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे तीव्र पडसाद उमटत असताना, संबंधित शाळेने मागील १५ दिवसांचे सीसीटीव्हीचे फुटेज गायब केल्याची गंभीर बाब चौकशी समितीच्या अहवालातून उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सोमवारी (२६ ऑगस्ट) चर्नीरोड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, गृह विभागामार्फत हा घटनेची चौकशी केली जाईल, असे सांगत बाधित मुलींच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची पूर्णतः जबाबदारी शासन उचलणार असल्याचे ते म्हणाले. (Badlapur School Case)

बदलापूरमधील अत्याचार घटनेच्या निषेधार्थ ९ तास रेल रोको करण्यात आले. तसेच महाविकास आघाडीच्यावतीने काळ्याफिती बांधून मुक आंदोलन करत संबधित घटनेचा तीव्र निषेध केला. सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी एक समिती नेमली. या समितीच्या चौकशीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. मंगळवारी दहीकाला असल्याने बुधवारी चौकशी अहवालावर सरकार निर्णय घेणार आहे. परंतु, समितीच्या प्राथमिक अहवालात धक्कादायक प्रकार समोर आला आहेत. प्रत्येक शाळा, परिसर, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी सरकारने सीसीटीव्ही असणे अनिवार्य केले आहे. याबाबत शासन निर्णय जारी केल्याचे केसरकर यांनी म्हटले. (Badlapur School Case)

(हेही वाचा – Drugs : बँकॉकहून फूड पाकिटातून आले अंमली पदार्थ; तिघांना अटक)

मात्र, बदलापूर शाळेतील १५ दिवसाचे सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्डिंग गायब केल्याचा प्रकार, अहवालातून समोर आल्याचे केसरकर यांनी सांगितले. शाळेतील १५ दिवसाचे सीसीटिव्ही रेकॉर्डिंग का गायब आहे? वॉशरुम जवळचे सीसीटीव्ही गायब आहे, याची चौकशी पोलिसांनी करावी. पुढील सर्व तपास गृहखात करणार आहे. आम्ही केवळ काही मुद्दे समोर आणत आहेत. चौकशीचे अधिकार गृह विभागाला असून या प्रकरणाची पोलिस सखोल चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. (Badlapur School Case)

घटनेची पुनरावृत्ती टाळणयासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून दोषी ठरणाऱ्यांवर कारवाईंचे आदेश दिले आहेत. कामिनी गायकर आणि निर्मला घुरे या दोन सेविकांवर सहआरोपी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. घटनेच्या तपासात काही अधिकारी दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. प्राध्यापक अर्चना आठवले यांना निलंबित केले असून त्यांच्यावर माहिती लपवल्याचे दिसून येते, असे केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले. तसेच शालेय व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे कारवाई झाली नव्हती. १६ ऑगस्टला खासगी रुग्णालयात तपासणी केल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. त्यानंतर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाला माहिती होती आणि त्यांनी ती लपवल्याचे समजून, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Badlapur School Case)

(हेही वाचा – Haryana Assembly Elections : हरियाणात काँग्रेस झाला बाप-लेकाचा पक्ष; किरण चौधरींची प्रखर शब्दात टीका)

१० लाखांची मदत

अत्याचाराच्या घटनेतील मुलीच्या कुटुंबीयांची लवकरच भेट घेणार आहोत. जिच्यावर अतिप्रसंग झाला तिला १० लाखांची तर जिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाला, त्या मुलीला तीन लाख मदत केली जाईल. शिवाय, दोघींच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी आम्ही उचलू आणि त्यासाठी लागणारी आर्थिक मदत दर महिन्याला चेक स्वरुपात दोघींना दिली जाईल. परंतु, मुलींची ओळख उघडकीस होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल, असे केसरकर म्हणाले. (Badlapur School Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.