Congress : काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला; शपथ घेतली आणि ८ दिवसांत मोडली

201
Congress : काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला; शपथ घेतली आणि ८ दिवसांत मोडली

‘जात, धर्म, भाषा असा भेदभाव करणार नाही,’ अशी शपथ घेऊन आठवडा होत नाही तोवरच काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते, माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मुस्लिम समाजाची वेगळी चूल मांडत मुस्लिमांना विधानसभा निवडणुकीत किमान २५ जागा मिळाव्या, अशी मागणी करत काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाडला.

ठाकरे यांनीही घेतली शपथ

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती २० जून हा दिवस पक्षातर्फे ‘सद्भावना दिन’ म्हणून साजरा केला जातो. यावर्षी या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थितांना एक शपथ दिली. त्यावेळी शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनीही शपथ घेतली, हे विशेष. ठाकरे यांनी तर काँग्रेसचे उपरणे देखील परिधान केले होते.

(हेही वाचा – Bank Holidays in September : सप्टेंबर महिन्यात कुठल्या सणाला बँका राहणार बंद? कधी असणार सुरू?)

दलवाई, शेख, खान व्यासपीठावर

“मी अशी प्रतिज्ञा करतो की मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा असा भेदभाव न करता भारतातील सर्व लोकांचे ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करीन. मी पुढे वचन देतो की आमच्यातील सर्व मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता संवाद आणि घटनात्मक मार्गाने सोडावेन,” अशी नाना पटोले यांनी सगळ्यांना दिली. हुसेन दलवाई, अस्लम शेख, नसीम खान यांनीही व्यासपीठावर उपस्थित रहात शपथ घेतली. मात्र या शपथेला फार काळ जागले नाही.

(हेही वाचा – Haryana Assembly Elections : हरियाणात काँग्रेस झाला बाप-लेकाचा पक्ष; किरण चौधरींची प्रखर शब्दात टीका)

मुस्लिम म्हणून जागा द्या

काँग्रेसमध्ये (Congress) मुस्लिम नेत्यांचा एक वेगळा गट असून त्यांनी आता काँग्रेसवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. दलवाई यांनी तर राज्यात किमान २५ जागा महाविकास आघाडीने मुस्लीम समाजाला द्याव्यात, अशी मागणी केली आहे. ९० टक्के मुस्लिम समाजाने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान केले असल्याने महाविकास आघाडीने आता मुस्लिम उमेदवार द्यावेत असे दलवाई म्हणाले. काही दिवसांपूर्वी अस्लम शेख यांनी किमान २० जागा मुस्लिम समाजाला द्याव्या, असे मत व्यक्त केले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.