- वंदना बर्वे
भारतीय जनता पक्षाने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक (Jammu-Kashmir Assembly Election) जिंकण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. केंद्रीय निवडणूक समितीची रविवारी उशिरा एक बैठक संपन्न झाली होती. यात भाजपाने जम्मू-काश्मीरात ९० पैकी ६६ जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. उमेदवारांची अंतिम यादी सुद्धा लवकरच येण्याची शक्यता आहे. सोमवारी (२६ ऑगस्ट) भाजपाने १५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
भाजपाचे मिशन-६६
राजकीय पक्षांनी हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची (Jammu-Kashmir Assembly Election) तयारी सुरु केली आहे. यात भाजपाने काश्मीरसाठी “मिशन ६६” निश्चित केले आहे. अर्थात ९० विधानसभेत भाजपाने ६६ जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
(हेही वाचा – Jihad : नेपाळमधील बस अपघातामागे ‘जिहाद’? )
केंद्रीय निवड समितीची बैठक
जम्मू-काश्मीरातील (Jammu-Kashmir Assembly Election) उमेदवाराची नावे ठरविण्यासाठी केंद्रीय निवड समितीची बैठक काल संपन्न झाली. उमेदवारांची अंतिम यादी लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा आणि इतर अनेक भाजप नेते उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमधील 90 जागांवर तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. निवडणुकीचा निकाल ४ ऑक्टोबरला लागणार आहे.
मतदान तीन टप्प्यात होणार
१८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या तीन टप्प्यात जम्मू-काश्मीरमधील सर्व ९० जागांवर मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल ४ ऑक्टोबरला लागणार आहे. काश्मिरी स्थलांतरितांसाठी दिल्ली, जम्मू आणि उधमपूरमध्ये विशेष मतदान केंद्रे बनवण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यासाठी २७ ऑगस्टपासून, दुसऱ्या टप्प्यासाठी ५ सप्टेंबरपासून आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १२ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. (Jammu-Kashmir Assembly Election)
(हेही वाचा – एसी ट्रेनमधील फुकट्या प्रवाशांसाठी Western Railway ची ‘स्पेशल अॅक्शन’)
पीडीपी-काँग्रेस नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
एकीकडे काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती आहे. त्याचवेळी खोऱ्यात ‘एकला चलो रे’ची रणनीती अवलंबणार असल्याचे भाजपाने ठरवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपा तरुण उमेदवारांना तिकीट देऊ इच्छित आहे. रविवारी पीडीपी नेते आणि मेहबूबी मुफ्ती यांच्या सरकारमधील मंत्री चौधरी झुल्फिकार अली यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी पूंछमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चौधरी अब्दुल गनी यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे. (Jammu-Kashmir Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community