Pune Airport : पुणे विमानतळाला संत तुकाराम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव

201
Pune Airport : पुणे विमानतळाला संत तुकाराम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव
  • प्रतिनिधी

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला (Pune Airport) जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा केली. राज्य सरकारने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी विनंती मोहोळ यांनी यावेळी केली.

(हेही वाचा – Congress : काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाटला; शपथ घेतली आणि ८ दिवसांत मोडली)

आपल्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करणार आहोत. विमानतळाचे नामकरण करतानाचा नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब होते. म्हणूनच पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे ही भूमिका मांडली आहे, अशी माहिती मोहोळ यांनी एक्स या समाज माध्यमातून दिली. (Pune Airport)

(हेही वाचा – Badlapur School Case : बदलापूरच्या ‘त्या’ शाळेतील १५ दिवसांचं CCTV फुटेज गायब, शिक्षणमंत्र्यांची माहिती)

पुण्याचे विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचं आजोळ होते. त्यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचे नातं जिव्हाळ्याचे होते. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही आपल्या भूमिकेप्रमाणेच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचे नाव देणं, हे अधिक समर्पक असणार आहे, असे मोहोळ यांनी म्हटले आहे. (Pune Airport)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.