काय आहे UPS पेन्शन योजना?
केंद्र सरकारने सरकारी युनिफाइड पेन्शन स्कीम योजनेची घोषणा केली. या योजनेचा 23 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
जर एखाद्या कर्मचाऱ्याने 25 वर्षे काम केले तर निवृत्तीपूर्वी शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळेल.
जर पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत मिळालेल्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम मिळेल.
जर 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळेल.
युपीएस योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.