- प्रतिनिधी
मुंबईतील पोलीस (Mumbai Police) ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. मुंबईतील पोलीस ठाण्यात शनिवारी महिला तक्रार निवारण दिवसाच्या निमित्ताने १ हजार ८४ महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. त्यात १२८ ज्येष्ठ महिलांचा समावेश आहे.
मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) महिलांच्या तक्रारींची गंभीरतेने घेतली जात आहे. या अनुषंगाने मुंबईतील पोलीस ठाण्यात येणाऱ्या महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशावरून प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रत्येक शनिवारी ‘महिला तक्रार निवारण दिवस’ आयोजित करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Bangladesh Violence : मुसलमान हिंदूंकडे मागत आहेत सोने, पैसे आणि मुली; बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार सुरूच)
मुंबईतील पोलीस (Mumbai Police) ठाण्यामध्ये शनिवारी झालेल्या महिला तक्रार निवारण दिवशी १०८४ महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. त्यात १२८ तक्रारी ज्येष्ठ महिला नागरिकांच्या होत्या. मागील पंधरा दिवसांत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात १४५२ तक्रारींची नोंद झाली होती, या तक्रारीत घरगुती वादाच्या तक्रारींचे प्रमाण अधिक होते, तर ज्येष्ठ महिलांच्या तक्रारीत देखील घरगुती भांडणाचा समावेश होता.
महिला पोलिस अधिकाऱ्यांकडून महिलांच्या तक्रारी दाखल करून त्यांच्या निपटारा करण्यात आला आहे. सदर तक्रारींचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर अधिकाऱ्यांकडून निवारण करण्यात आले. मुंबईतील ९१ पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित अपर पोलीस आयुक्त, पोलीस उप-आयुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या उपस्थित महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आलेले असून महिलांबाबतीत कोणतेही गुन्हे घडल्यास, नागरिकांनी हेल्पलाईन क्र. १०९० किंवा १००/११२ डायल करून संपर्क साधावा असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Mumbai Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community