Laser Lights Ban : पुण्यात गणेशोत्सवात लेझर वापरास बंदी

90
Laser Lights Ban : पुण्यात गणेशोत्सवात लेझर वापरास बंदी

डोळे दिपवणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर (Laser Lights Ban) विसर्जन मिरवणुकीत बंदी घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिले. सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पुढील साठ दिवस शहर परिसरात लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले.

(हेही वाचा – आमदार Mihir Kotecha यांच्या नावाने कोण करतंय बेकायदेशीर वसुली)

लोहगाव परिसरात हवाईदलाचा तळ आहे, तसेच नागरी विमानतळ आहे. लेझर दिव्यांमुळे (Laser Lights Ban) वैमानिकांचे डोळे दिपून अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून नियमित आदेश काढण्यात येत असतात. आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे शर्मा यांनी आदेशात नमूद केले आहे.

(हेही वाचा – Mulund Swimming Pool ची दुरुस्ती आणि नवीन फिल्टरेशन प्लांट)

गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेझर दिव्यांचा (Laser Lights Ban) मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. लेझर दिव्यांमुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणुकीत लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.