पेणच्या (जि. रायगड) सुमारे दोन हजार कार्यशाळांमधून गतवर्षी सुमारे सव्वा लाख गणेशमूर्ती निर्यात झाल्या होत्या. त्यात यंदा गणेशोत्सवासाठी (Ganesh Chaturthi 2024) ७५ हजारांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १५ लाख गणेशमूर्तीची निर्मिती झाली असून, २ लाख गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. यंदा पेणच्या गणेशमूर्तीना जीआय (जिऑग्राफीकल इंडेक्स) मानांकन आणि गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायाला उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला असल्याने परदेशात निर्यात होणाऱ्या गणेशमूर्तीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
१५ हजारांवर कामगारांना रोजगार
यंदा ७ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत असून, तीन महिन्यांपासून पेण तालुक्यातील गणेशमूर्ती संपूर्ण महाराष्ट्रासह देशात व परदेशात पाठवल्या जात आहेत. तालुक्याच्या विविध भागांत २ हजारांच्या आसपास कारखान्यांतून १५ लाख गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यात शाडू आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा समावेश आहे. गणेशमूर्ती निर्मिती व्यवसायात तालुक्यातील १५ ते १८ हजार कामगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. (Ganesh Chaturthi 2024)
Join Our WhatsApp Community