Mukhyamantri Ladki Bahin Yojana अंतर्गत ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना कधी मिळणार पैसे?

191

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 प्रमाणं एका वर्षात 18 हजार रुपये पाठवले जाणार आहेत. राज्य सरकारनं ही योजना महत्त्वकांक्षी योजना म्हणून राबवली आहे. या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

(हेही वाचा Church : झारखंड, मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्‍यांतील चर्चच्‍या संख्‍येत दुपटीने झाली वाढ)

31 ऑगस्टला कुणाच्या खात्यात येणार 3 हजार रुपये?

लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे. या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. दुसरा राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत. त्यांच्या अर्जांची छाननी सुरु असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या. ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जांनुसार नागपूरच्या कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता. त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1 कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.