-
ऋजुता लुकतुके
यावर्षी ऑक्टोबर महिन्यात महिलांचा टी-२० विश्वचषक (Women’s T20 World Cup 2024) पार पडणार आहे. आधी बांगलादेश, मग भारत असं करत करत आता युएईमध्ये ही स्पर्धा होणार हे ठरल्यानंतर लगेचच आयसीसीने (ICC) वेळापत्रकही जाहीर केलं आहे. भारतीय संघ या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली उतरेल. आणि नेहमीप्रमाणे सगळ्यांना उत्सुकता असेल ती भारताच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबरच्या सामन्याची.
६ ऑक्टोबर रोजी भारतीय महिला संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. याआधी भारतीय संघ २ सराव सामनेही खेळणार आहे. या स्पर्धेचे आयोजन ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. (Women’s T20 World Cup 2024)
(हेही वाचा – Muslim : धर्मांतरास नकार देणाऱ्या हिंदु तरुणीवर वासनांध मुसलमानांचा सामूहिक बलात्कार)
Unveiling the updated fixtures for the ICC Women’s #T20WorldCup 2024 🗓https://t.co/k4chTlN68C
— ICC (@ICC) August 26, 2024
२०२० च्या उपविजेत्या भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यासह सहा वेळा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला अ गटात ठेवण्यात आले आहे. तर २०१६ च्या चॅम्पियन वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंडसह दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला ब गटात ठेवण्यात आले आहे. श्रीलंका आणि स्कॉटलंड या वर्षाच्या सुरुवातीला अबू धाबी येथे झालेल्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषक (Women’s T20 World Cup 2024) पात्रता स्पर्धेद्वारे स्पर्धेसाठी पात्र ठरले होते.
महिला टी-२० विश्वचषकात (Women’s T20 World Cup 2024) संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. अंतिम सामना २० ऑक्टोबर रोजी दुबई येथे होणार आहे तर उपांत्य फेरी १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीसाठी राखीव दिवस निश्चित करण्यात आला आहे. दुबई आणि शारजाह या दोन ठिकाणी एकूण २३ सामने खेळवले जातील.
(हेही वाचा – German language training : मुंबईतील १५ केंद्रावर मिळणार युवकांना जर्मन भाषेचे धडे)
अ गट : ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका.
ब गट : दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, स्कॉटलंड.
महिला टी-२० विश्वचषक २०२४चे नवीन वेळापत्रक
- ३ ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, शारजा
- ३ ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजा
- ४ ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
- ४ ऑक्टोबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
- ५ ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध इंग्लंड, शारजा
- ५ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, शारजा
- ६ ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
- ६ ऑक्टोबर : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
- ७ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजा
- ८ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजा
- ९ ऑक्टोबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्कॉटलंड, दुबई
- ९ ऑक्टोबर : भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
- १० ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजा
- ११ ऑक्टोबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई
- १२ ऑक्टोबर : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजा
- १२ ऑक्टोबर : बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई
- १३ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजा
- १३ ऑक्टोबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजा
- १४ ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, दुबई
- १५ ऑक्टोबर : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई
- १७ ऑक्टोबर : उपांत्य फेरी 1, दुबई
- १८ ऑक्टोबर : उपांत्य फेरी 2, शारजाह
- १० ऑक्टोबर : अंतिम सामना, दुबई
हेही पहा –
Join Our WhatsApp Community