- प्रतिनिधी
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम हिला शरद पवार गटातून निवडणूक उमेदवारी देणार असल्याने धर्मरावबाबांच्या विरोधात त्यांची कन्याच निवडणूक लढविणार असल्याचा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे.
सोमवारी, (२६ ऑगस्ट) ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचा गोंदिया जिल्हा कार्यकर्ता मेळावा व पुढील विधानसभा निवडणुकीसंदर्भात आढावा सभा झाली. त्यानिमित्त अनिल देशमुख गोंदियाला आले होते. त्यांनी पत्रपरिषदेत ही घोषणा केली. (Ajit Pawar)
(हेही वाचा – Women’s T20 World Cup 2024 : भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांना ‘या’ तारखेला भिडणार)
वडिलांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही
गोंदियात सोमवारच्या आढावा बैठकीसंदर्भात माहिती देतांना अनिल देशमुख म्हणाले, धर्मरावबाबांची कन्या भाग्यश्री आत्राम हिने शरदचंद्र पवार यांची तीन वेळा भेट असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही भेटली. वडिलांनी अजित पवार (Ajit Pawar) गटात जाण्याचा घेतलेला निर्णय मला मान्य नाही, असेही ती म्हणाली.
अनिल देशमुख पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील ७ विधानसभा जागेपैकी गोंदिया जिल्हयातील तिरोडा अर्जुनी मोरगाव आणि भंडारा जिल्ह्यातील तुमसर या तीन जागेवर आपला दावा करणार आहे. तीन ही जागेवर पक्षांनी आपली तयारी जोमाने सुरू केली. कार्यकर्त्यांना या बाबतची माहिती या आढावा बैठकीतून देण्यात आली आहे. (Ajit Pawar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community