चाचण्यांची संख्या वाढूनही रुग्णसंख्या ७००च्या घरातच!

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ७२० दिवसांवर आला!

137

मुंबईतील कोरोना चाचण्यांची संख्या वाढवूनही रुग्णांची संख्या सातशेच्या घरातच सीमित आहे. शुक्रवारी दिवसभरात जिथे ७६२ रुग्ण आढळून आले होते, तिथे शनिवारी ६९६ रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे शुक्रवारी दिवसभरात जिथे एकूण ३० हजार ४४७ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या होत्या, तेव्हा ७६२ रुग्ण आढळून आले होते. तर शनिवारी दिवसभरात  ३३ हजार १३६ चाचण्या करण्यात आल्यानंतरही रुग्णसंख्या ६९६ एवढी आढळून आली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक समाधानाची बाब आहे.

शनिवारी १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली!

शनिवारी दिवसभरात ७९० रुग्ण बरे होवून घरी परतले असून एकूण १४ हजार ७५१ रुग्णांवर उपचार सरु आहेत. शुक्रवारी जिथे १९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती, तिथे शनिवारी १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये ०९ रुग्ण हे दीर्घकालिन आजाराचे आहेत. यामध्ये ०८ पुरुष आणि ०५ महिला रुग्णांचा समावेश होता. यातील ४० वर्षांखालील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ६० वर्षांवरील १० रुग्ण होते आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या ०१ एवढी होती.

(हेही वाचा : ‘ते’ लसीकरण बनावटच! महापालिका उपायुक्तांचा अहवाल )

मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ७२० दिवसांवर!

मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ७२० दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ८२ मारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून झोपडपटी व चाळींची संख्या १८ एवढी आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.