Jammu Kashmir Assembly Election : भाजपाचे ‘हे’ असतील स्टार प्रचारक

93
Jammu Kashmir Assembly Election : भाजपाचे 'हे' असतील स्टार प्रचारक

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा (Jammu Kashmir Assembly Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. यात सर्वात आघाडीवर भाजपा आहे. मोदींच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीर मध्ये जोरात प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारक निवडण्यात आले आहे. भाजपाने आपल्या १५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याशिवाय आता भाजपाने पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे.

(हेही वाचा – T20 world Cup 2024 : भारताने विश्वचषक जिंकला; पण, स्टार स्पोर्ट्सचं मोठं नुकसान)

भाजपाने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत सर्वात पहिलं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आहे. त्यानंतर भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह यांच्याही नावांचा समावेश आहे. याशिवाय या यादीत नितीन गडकरी, मनोहरलाल खट्टर, जी. किशन रेड्डी, शिवराज सिंह चौहान, जयराम ठाकूर, डॉ. जितेंद्र सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राम माधव, तरुण चुघ, आशिष सूद, जुगल किशोर शर्मा, जेनब गुलाम अली खटना, डॉ. नरिंदर सिंह, अनुराग ठाकूर, स्मृती इराणी, जनरल व्ही. के. सिंह, रविंद्र रैना, अशोक कौल, डॉ. निर्मल. सिंह आणि कविंद्र गुप्ता आदींचाही समावेश आहे. (Jammu Kashmir Assembly Election)

(हेही वाचा – डोळा मारणे हा विनयभंगच; Mumbai Mazgaon District Megistrate चा महत्वाचा निर्णय; आरोपीला सुनावलेली शिक्षा)

या यादीत समावेश असणारा प्रत्येक नेता जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत (Jammu Kashmir Assembly Election) भाजपाकडून जाहीर झालेल्या उमेदवारांसाठी निवडणूक प्रचार करेल. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.