महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना आता देशाची राजधानी दिल्लीतही भेटता येणार आहे. केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने शिंदे यांना पंडित पंत मार्गांवर एक बंगला दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबईत वर्षा नावाचा सरकारी बंगला आहे. मुख्यमंत्र्यासाठी वर्षा बंगला राखीव आहे. मात्र शिंदे यांना देशाची राजधानी दिल्लीच्या ल्युटियान झोनमध्ये सुद्धा सरकारी बंगला मिळाला आहे.
केंद्र सरकारच्या शहरी विकास मंत्रालयातर्फे प्रत्येक राज्याला सहा फ्लॅट दिले जातात. हे फ्लॅट कुणाला द्यायचे याचा निर्णय राज्य सरकारने अर्थात दिल्लीतील निवासी आयुक्तालयाने घ्यायचा असतो. महाराष्ट्राच्या दिल्लीतील आयुक्त कार्यालयाने आपल्या कोट्यातील काही फ्लॅट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
(हेही वाचा – टोल नाक्यावर वाहन चालकांची होतेय फसवणूक; FASTag मध्ये पैसे तरीही वसुली)
केंद्र सरकारच्या नियमानुसार, कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल आपल्या राज्याच्या कोट्यातून स्वतःसाठी घराची मागणी करू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde यांना दिल्लीत मिळालेला बंगला हा दोन फ्लॅटच्या बदल्यात मिळाला आहे. केंद्राला दोन फ्लॅट देऊन त्या बदल्यात एक बंगला घेण्यात आला आहे.
सध्या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत बंगला घेतला आहे. या यादीत आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde यांचे नाव जुळले आहे. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बंगला घेतला होता. आता हा बंगला विद्यमान मुख्यमंत्र्यांना मिळाला आहे. याशिवाय, आंध्रप्रदेश, उत्तराखंड आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बंगला घेतला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community