Jai Shah यांची ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; १ तारखेपासून कारभार सांभाळणार

147
Jai Shah यांची ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; १ तारखेपासून कारभार सांभाळणार
Jai Shah यांची ICC च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; १ तारखेपासून कारभार सांभाळणार

ICC चे नवे अध्यक्ष म्हणून जय शाह (Jai Shah) यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे आहे. न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले (Greg Barclay of New Zealand) यांनी आधीच तिसरी टर्म घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे जय शाह वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहे. शाह यांनी फार कमी वेळात एवढं मोठं स्थान मिळवलं आहे. जय शाह हे १ डिसेंबरपासून आयसीसीच्या अध्यक्षपदाचा (icc president) कारभार सांभाळतील. विशेष बाब म्हणजे ते आयसीसीचे अध्यक्ष झाल्याने बीसीसीआयच्या सचिवपदी कोणाची वर्णी लागते याची सर्वांनाच उत्सुकता आहे.  (Jai Shah)

(हेही वाचा – City Street Vendors Committee Election : गाळेधारक हे फेरीवाले कसे, फेरीवाल्यांकडूनच उपस्थित केला जातोय सवाल)

जय शाह (Jai Shah) हे १ डिसेंबरपासून आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कारभार सांभाळतील. ३५ वर्षीय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष झाले आहेत. दरम्यान, आयसीसीचे मावळते अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी २० ऑगस्ट रोजी पुन्हा आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार कळवला होता. नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. शाह हे एकमेव उमेदवार असल्याने आणि त्यांची जागतिक क्रिकेटवर असलेली पकड पाहता त्यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यांनी २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी ठोस पावले टाकली, असे आयसीसीने एका निवेदनात सांगितले आहे. (Jai Shah)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.