नामिबियावरून आणलेले चित्ते मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) अधिवासात होते. याठिकाणी मंगळवारी पवन (pawan) नामक चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. ५ ऑगस्ट रोजी कुनोमध्येच पाच महिन्यांचा आफ्रिकन चित्ता जेमीनीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काही दिवसातच पवनच्या मृत्यूची माहिती समोर आली आहे.
२४ चित्ता उरले
पवनच्या मृत्यूनंतर आता कुनो राष्ट्रीय उद्यानात २४ चित्ता उरले आहेत. त्यापैकी १२ मोठे आणि १२ नवजात पिले आहेत. सिंह प्रकल्पाचे संचालक आणि एपीसीसीएफ प्रकल्पाचे अधिकारी उत्तम शर्मा यांनी यावर एक निवेदन प्रसिद्ध करून पवनच्या मृत्यूबाबत माहिती दिली. मंगळवारी सकाळी १०.३० वाजता कुनोमधील एका नाल्यात पवनचा मृतदेह आढळल्याचे त्यांनी सांगितले. (Kuno National Park)
पवन सर्वात वेगात पळणारा चिता होता…
पशुवैद्यांनी पवनच्या मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता पवन पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नाहीत. पवनला १७ सप्टेंबर २०२२ रोजी पतंप्रधान मोदींच्या जन्मदिनी नामिबियावरून भारतात आणले गेले होते. पहिल्या वेळी आठ चित्ते आणले गेले होते. यात पाच मादी व तीन नर चित्त्यांचा समावेश होता. ज्यामध्ये पवन सर्वात वेगात पळणारा चिता असल्याचे सांगितले जात होते. पवनच्या मृत्यूचे खरे कारण समजण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची वाट पाहावी लागणार आहे, अशी माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. (Kuno National Park)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community