लष्करातील जवानांच्या वाहनाला भीषण अपघात (Army Truck Accident) झाल्याची माहिती आहे. अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) सुबनसिरी जिल्ह्यात लष्काराचा ट्रक खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तीन जवान हुतात्मा झाले आहेत. तर चार जण जखमी आहेत. जखमी जवानांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
(हेही वाचा –नामिबियावरून आणलेल्या Kuno National Parkमधील आणखी एका चित्त्याचा मृत्यू)
पोलिसांनी बुधवारी (२८ ऑगस्ट) ही माहिती दिली. ट्रान्स अरुणाचल महामार्गावरील तापी गावाजवळ मंगळवारी (२७ ऑगस्ट) सकाळी ६ वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. हवालदार नखत सिंग, नाईक मुकेश कुमार आणि ग्रेनेडियर आशिष अशी हुतात्मा जवानांची नावे आहेत. (Army Truck Accident)
(हेही वाचा –kolkata rape case: पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला! पोलिसांसह आंदोलक जखमी, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी)
हुतात्मा झालेले सैनिक लष्कराच्या ईस्टर्न कमांडचे कर्मचारी होते. ईस्टर्न कमांडने आपल्या जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे.लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झालेला लष्करी ट्रक हा लष्करी ताफ्याचा एक भाग होता. जो दापोरिजो, अप्पर सुबनसिरी या जिल्हा मुख्यालयातून लेपराडा जिल्ह्यातील बासरकडे जात होता. यादरम्यान तो तापी गावाजवळ एका खोल दरीत कोसळला. अपघात झाल्याचं कळताच परिसरातील स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी जवानांना वाचवण्यासाठी आणि मृत जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. (Army Truck Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community