Duleep Trophy : दुलिप करंडकाच्या पहिल्या फेरीतून मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांना विश्रांती

Duleep Trophy : बीसीसीआयने दोघांच्या ऐवजी बदली खेळाडू जाहीर केले आहेत 

95
Duleep Trophy : दुलिप करंडकाच्या पहिल्या फेरीतून मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांना विश्रांती
Duleep Trophy : दुलिप करंडकाच्या पहिल्या फेरीतून मोहम्मद सिराज, उमरान मलिक यांना विश्रांती
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघातील तेज गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि उमरान मलिक (Umran Malik) हे दोघंही दुखापतींमुळे दुलिप करंडकातील पहिल्या फेरीचे सामने खेळू शकणार नाहीत. त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्या जागी बदली खेळाडूंची निवड केली आहे. त्याचबरोबर रवींद्र जाडेजानेही ब संघातून माघार घेतली आहे. दुलिप करंडक ही देशांतर्गत क्रिकेट हंगामातील पहिली कसोटी स्पर्धा असणार आहे. आगामी बांगलादेश मालिका तसंच ऑस्ट्रेलिया दौरा पाहता बीसीसीआयने सर्वच खेळाडूंनी ही स्पर्धा खेळण्याची सक्ती केली आहे. (Duleep Trophy)

(हेही वाचा- Crime News: बदलापूरात चिमुरडी पून्हा ठरली वासनेचा बळी! पित्यानेच केले पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार)

पण, त्याचवेळी तेज गोलंदाजांना यातून सूटही दिली आहे. कारण, व्यस्त क्रिकेट कार्यक्रमाचा गोलंदाजांच्या तंदुरुस्तीवर इतरांपेक्षा जास्त परिणाम होत असतो. त्यामुळे मुख्य तेज गोलंदाज जसप्रीत बुमराला (Jasprit Bumrah) आधीच विश्रांती देण्यात आली होती. आता सिराज आणि मलिकही दुखापतीमुळे खेळणार नाहीएत. त्यांच्या ऐवजी नवनीत सैनीची ब संघात निवड झाली आहे. तर क संघात गौरव यादवची निवड झाली आहे. (Duleep Trophy)

‘सिराज आणि उमरान मलिक हे दोघेही सध्या आजारी आहेत. दुलिप करंडकाच्या पहिल्या फेरीपर्यंत तंदुरुस्त होण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांच्या ऐवजी नवनीत सैनी आणि गौरव यादव यांची निवड अनुक्रमे संघ ब आणि संघ क मध्ये करण्यात आली आहे. तर क संघातून रवींद्र जडेजालाही मुक्त करण्यात आलं आहे,’ असं बीसीसीआयने अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. (Duleep Trophy)

(हेही वाचा- Thackeray vs Rane: मालवणमध्ये भाजपा आणि उबाठा आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी)

५ सप्टेंबरला बंगळुरूत चिन्नास्वामी आणि अनंतपूर इथं दुलिप करंडकाची (Duleep Trophy) पहिली फेरी होणार आहे.

दुलिप करंडकाने भारताचा यंदाचा क्रिकेट हंगाम सुरू होईल. यात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची ४ संघांमध्ये विभागणी करण्यात येते. भारत ए, भारत ब, भारत क आणि भारत ड असे चार संघ तयार करून हे संघ एकमेकांशी एकेकदा भिडतात. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना होतो. यंदा भारतीय अ संघाचं नेतृत्व शुभमन गिल, ब संघाचं नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन, क संघाचं नेतृत्व ऋतुराज गायकवाड तर ड संघाचं नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहेत.  (Duleep Trophy)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.