BMC : दुय्यम अभियंत्यांना सहायक अभियंता पदी बढती, वशिलेबाजांनी आणला प्रशासनाच्या नाकात दम

8376
Hindustan Post Exclusive : हिंदुस्थान पोस्ट चा अंदाज खरा ठरला....डॉ शिंदे जागी डॉ. विपिन शर्माच
Hindustan Post Exclusive : हिंदुस्थान पोस्ट चा अंदाज खरा ठरला....डॉ शिंदे जागी डॉ. विपिन शर्माच
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

मुंबई महापालिकेतील दुय्यम अभियंता पदावरील अभियंत्यांना सहायक अभियंता पदावर बढती देण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्याने सुमारे दीडशे अभियंते सहायक अभियंता पदासाठी पात्र ठरले आहेत. परंतु. सहायक अभियंतापदी बढती मिळालेल्या अभियंत्यांकडून आता क्रिम पोस्टसाठी राजकीय पुढारी तसेच सरकारमधील मंत्र्यांचे वशिलाबाजी सुरु असल्याने कुठल्या अभियंत्यांची वर्णी कुठे लावली जावी या पेचातच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पडले असल्याची माहिती मिळत आहे. या वशिलेबाजीमुळेच सहायक अभियंता पदी बढती मिळूनही अनेक अभियंते आजही नवीन पोस्टींगच्या प्रतीक्षेत असून वशिलेबाज अभियंत्यांमुळे प्रामाणिक अभियंत्यांची मोठी अडचण झाल्याचे पहायला मिळत आहे. (BMC)

(हेही वाचा- Thackeray vs Rane: मालवणमध्ये भाजपा आणि उबाठा आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी)

महापालिकेतील सिव्हीलच्या ११४ आणि यांत्रिक व विद्युत विभागातील ६० हून अधिक दुय्यम अभियंत्यांना सहायक अभियंतापदी पदोन्नती देण्याचा प्रस्ताव मागील काही दिवसांपूर्वी मंजूर करण्यात आला. मात्र, आजवर पदोन्नतीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर जिथे जिथे रिक्त जागा आहेत, तिथे तिथे त्या अभियंत्यांची ऑर्डर काढली जात होती. परंतु यावेळेस पदोन्नतीचा प्रस्ताव मंजूर होऊनही केवळ अमुक ठिकाणीच पोस्टींग मिळावी म्हणून अनेक अभियंत्यांनी वशिलेबाजी लावल्याने या अनेक रिक्त जागी ऑर्डर काढताना अडचणी येत आहेत. अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांना या वशिलेबाज अभियंत्यांच्या ऑर्डर काढताना नाकी दम आला असून एकाच जागेसाठी दोन दोन अभियंत्यांनी दावा केल्याने या अडचणी वाढत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दुसरा पर्याय स्वीकारुन जिथे जिथे सहायक अभियंत्यांचा सेवा कालावधी तीन वर्षांचा झाला आहे, त्याठिकाणच्या अभियंत्यांची बदली करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ज्यामुळे वशिलेबाजांचे पुनर्वसन तिथे करयाचा प्रयत्न सुरु आहे असल्याचे बोलले जात आहे. (BMC)

महत्वाचे म्हणजे पदोन्नती आणि बदली या दोन वेगवेगळया गोष्टी असून पदोन्नती देण्यात येणाऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती ही रिक्त जागी करणे आवश्यक असते. परंतु आता या रिक्त जागा करण्यासाठी महत्वाच्या जागांवरील अभियंत्यांच्या बदल्या करून त्या जागा नव्याने बनलेल्या सहायक अभियंत्यांसाठी रिक्त केल्या जात आहे. त्यामुळे या पदोन्नतीतील काही वशिलेबाज अभियंत्यांसाठीच प्रशासन काम करत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात ऐकायला मिळत आहे.  (BMC)

(हेही वाचा- Crime News: बदलापूरात चिमुरडी पून्हा ठरली वासनेचा बळी! पित्यानेच केले पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार)

यापूर्वी काही कडक शिस्तीच्या अतिरिक्त आयुक्तांनी वशिलेबाज अभियंत्यांची प्रकरण बाजुला ठेवून उर्वरीत अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते. ज्यामुळे प्रामाणिक अभियंत्यांची नियुक्ती वेळीच होत असे. परंतु अभियंत्यांच्या नियुक्तीतील वशिलेबाजी रोखण्यासाठी लॉटरी सोडत पध्दत काढली जाणे आवश्यक आहे, मात्र, प्रशासन या पध्दतीचा अशाप्रकारे वशिलेबाजी होत असतानाही  अवलंब करत नसल्याने अभियंता वर्गाकडूनच तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (BMC)

हेही पहा-  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.