taraporewala aquarium : तारापोरवाला मत्स्यालयात कोणकोणते मासे पाहू शकाल?

122
taraporewala aquarium : तारापोरवाला मत्स्यालयात कोणकोणते मासे पाहू शकाल?

तारापोरवाला मत्स्यालय (taraporewala aquarium) हे मुंबईतील एक प्रमुख आकर्षण आहे आणि भारतातील सर्वात जुने मत्स्यालय आहे. हे मत्स्यालय मरीन ड्राईव्हवर स्थित असून १९५१ मध्ये याचे उद्घाटन करण्यात आले आणि तेव्हापासून सागरीजीव-प्रेमी आणि सर्वांचेच एक आवडते ठिकाण आहे.

तारापोरवाला मत्स्यालय (taraporewala aquarium) १९५१ मध्ये उभारण्यात आले. हे मत्स्यालय उभारण्यासाठी रु. ८००,००० एवढा खर्च आला. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. मत्स्यालयाचे नाव पारसी समाजसेवक डी.बी. तारापोरवाला यांच्या नावावरुन ठेवले आहे. त्यांनी या बांधकामासाठी रु. २००,००० रुपये देणगी दिली होती. ३ मार्च २०१५ रोजी मत्स्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले. यासाठी नूतनीकरण रु. २२ कोटी एवढा खर्च झाला आहे.

(हेही वाचा – US Open Longest Game : जेव्हा ५ तास आणि ३५ मिनिटांनंतर डॅनिएल इव्हान्सने कॅचनोव्हला हरवलं….)

मत्स्यालयाची (taraporewala aquarium) देखभाल मत्स्यव्यवसाय विभागाकडून केली जाते. मत्स्यालयामध्ये १६ समुद्री पाण्याच्या टाक्या आणि ९ गोड्या पाण्याच्या टाक्या आहेत. यामध्ये ३१ प्रकारचे मासे आहेत, तर ३२ उष्णकटिबंधीय टाक्यांमध्ये ५४ प्रकारचे मासे आहेत. मत्स्यालयाच्या उष्णकटिबंधीय विभागात गरोदर माशांसाठी “मॉस ऍक्वैरियम”, “प्लांटेशन ऍक्वेरियम” आहे, ज्यामध्ये आयात केलेल्या पाण्यातील लिली आणि इतर जलीय वनस्पती आणि “बेट मत्स्यालय” आहेत. त्यामुळे हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

समुद्री आणि गोड्या पाण्याच्या प्रजाती :

मत्स्यालयात शार्क, कासव, रेय्ज आणि समुद्री घोडे यांसह समुद्री आणि गोड्या पाण्यातील माशांच्या १०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत.

काचेचा बोगदा :

मत्स्यालयाचे (taraporewala aquarium) मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे १२-फूट-लांब असलेला काचेचा बोगदा, इथे आल्यावर तुम्हाला समुद्रात प्रवेश केल्याचा अनुभव मिळतो.

(हेही वाचा – Thackeray vs Rane: मालवणमध्ये भाजपा आणि उबाठा आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी)

शैक्षणिक प्रदर्शन :

ऍक्वेरियममध्ये जीवाश्म, संरक्षित मासे आणि दुर्मिळ समुद्री कवच असलेले प्रदर्शन देखील आहे.

तारापोरवाला मत्स्यालयाचा पत्ता :

नेताजी सुभाषचंद्र बोस रोड, मरीन ड्राईव्ह, चर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळ, गिरगाव, मुंबई, महाराष्ट्र ४००००२.
संपर्क : ०२२-२२८२१२३९

मत्स्यालय मंगळवार ते रविवार खुले असते आणि सोमवारी बंद असते. (taraporewala aquarium)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.